टायगर श्रॉफने पुन्हा केला जीवघेणा स्टंट, सुनील शेट्टीसह चाहते म्हणाले 'Oh just casual'

टायगर श्रॉफने पुन्हा केला जीवघेणा स्टंट, सुनील शेट्टीसह चाहते म्हणाले 'Oh just casual'

टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : बॉलिवूडचा अॅक्शन किंग टायगर श्रॉफ(Tiger Shroff)चा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना टायगरनं 'हॅशटॅगमूड' असं कॅप्शनही दिलं आहे. टायगर श्रॉफने पुन्हा केला जीवघेणा स्टंट, सुनील शेट्टीसह चाहते म्हणाले 'Oh just casual' त्याच्या स्टंटवर बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनीही रिअॅक्शन दिल्या आहेत.

टायगर समुद्रात पोहण्यासाठी स्टंट करत असल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ 20 लाखहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे. टायगर आपल्या फॅन्ससाठी सतत अपडेट्स देत असतो. मात्र त्याचे स्टंट आणि डान्स दोन्ही भन्नाट आहेत. वॉर सिनेमातून टायगरनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तो आगामी चित्रपट बाकीच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

#mood

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

 

View this post on Instagram

 

Auditioning for the matrix 😜

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी मागच्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करत आहे. नुकतंच या सिनेमाचं शूट सुरू झालं आहे. बागीमध्ये टायगर श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसला होता. तर बागी 2 मध्ये तो दिशा पाटनीसोबत दिसला होता. त्यानंतर आता बागी 3 मध्ये पुन्हा एकदा श्रद्धा कपूर दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग जयपूरमध्ये सुरू असून या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात टायगरला पोलिस अटक करताना दिसत आहेत.बागी 3 मध्ये टायगर श्रॉफसोबतच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खाननं केंल आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 11:05 AM IST

ताज्या बातम्या