लॉकडाऊनमध्ये या व्यक्तीला मिस करतेय टायगर श्रॉफची बहीण, Photo शेअर करून म्हणाली...

लॉकडाऊनमध्ये या व्यक्तीला मिस करतेय टायगर श्रॉफची बहीण, Photo शेअर करून म्हणाली...

सध्या लॉकडाऊनध्ये कृष्णा तिच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला खूप मिस करत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वजण आपापल्या घरात आहेत. त्यामुळे एकमेकांना भेटणं कोणालाच शक्य नाही अशात टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ मात्र तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या लॉकडाऊनध्ये कृष्णा तिच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला खूप मिस करत आहे.

कृष्णा श्रॉफनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिचा बॉयफ्रेंडं एबनसोबत दिसत आहे. कृष्णाला या लॉकडाऊनमध्ये बॉयफ्रेंडची खूप आठवण येत आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्यासाठी एक खास मेसेज लिहिला आहे. तिनं लिहिलं, 'माझ्या पेक्षा एक फुट उंच असल्याबद्दल थँक्यू, कोणत्याही अँगलमधून फोटो क्लिक करा. माझ्या चेहऱ्यावरील डबल चिन दिसत नाही. मिस यू'

कृष्णा श्रॉफ तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्सवर खूप प्रेम करते आणि हे प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना ती कधीच मागे पुढे पाहत नाही. याआधीही अनेकदा तिनं एबनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लॉकडाऊन सुरू होण्याआधी एबन आणि कृष्णा एकत्र व्हेकेशनवर गेले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये कृष्णा सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं बाबा जॅकी श्रॉफ सोबत एक फोटो शेअर केला होता. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. कृष्णा नेहमीच विनामेकअप फोटो शेअर करताना दिसते आणि मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसते. ती तिच्या भावाप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे.

जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

VIDEO: चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढणं पडलं महागात, अशी झाली उर्वशी रौतेलाची अवस्था

First published: May 23, 2020, 3:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading