टायगरची बहीण म्हणते, माझा भाऊ सिंगलच पण दिशासाठी 'हा' अभिनेता परफेक्ट

टायगरची बहीण म्हणते, माझा भाऊ सिंगलच पण दिशासाठी 'हा' अभिनेता परफेक्ट

दिशा आणि टायगर यांनी त्यांचं नातं ऑफिशिअली मान्य केलं नसलं तरीही ते दोघं नेहमीच सगळीकडे एकत्र दिसतात.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं. मात्र या दोघांनीही कधीच हे नातं मान्य केलेलं नाही. आम्ही दोघंही खूप चांगले मित्र असल्याचं हे दोघंही सांगताना दिसतात. मात्र आता या दोघांच्या रिलेशनशिपवर टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ हिनं प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णानं तिचा भाऊ 100 टक्के सिंगल आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा आणि टायगर यांनी त्यांचं नातं ऑफिशिअली मान्य केलं नसलं तरीही ते दोघं नेहमीच सगळीकडे एकत्र दिसतात. याशिवाय टागरच्या बहीणीशी सुद्धा दिशाचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मात्र कृष्णाचं म्हणणं आहे की टायगर अद्याप सिंगल आहे. एका चॅट शोमध्ये स्वतःच्या रिलेशनशिप बद्दल बोलताना कृष्णा म्हणाली, प्रत्येकजण ही गोष्ट आपापल्या पद्धतीनं हँडल करतो. मला माझ्या रिलेशनशिप बाबत सार्वजनिक ठिकाणी बोलायला काही हरकत नाही मात्र मला समजत नाही रिलेशिप सारख्या मुद्द्यावर लोक जास्त हाइप का होतात. मी ज्या व्यक्तीसोबत राहीन त्याचा मला नेहमीच अभिमान असेल त्यामुळे मला ही गोष्ट लपवण्याची गरज नाही.

...म्हणून सलमान खानने स्वतःला मारून घेतले चाबकाचे फटके, पाहा VIDEO

टायगरच्या रिलेशनशिप बद्दल बोलताना कृष्णा सांगते, सर्वांनाच माहित आहे की, मी खोटं बोलत नाही. टायगर 100 टक्के सिंगल आहे. मी एक प्रोटेक्टिव्ह बहीण आहे आणि टायगर एक साधा सरल मुलगा हे त्यामुळे अनेकजण त्याच्या या स्वभावाचा फायदा घेतात. त्यामुळे मी माझ्या भावावाबत नेहमीच अलर्ट असते. त्याची अशी कोणतीच गर्लफ्रेंड नसेल जी मी अप्रुव्ह केली नसेन.

या चॅट शोमध्ये कृष्णाला दिशा पाटनीबाबतही प्रश्न विचारले गेले. त्यावर ती म्हणाली, मी तिला अदित्य रॉय कपूरसोबत सेटअप करण्यासाठी मदत करू शकते. तसेच टागरला एखाद्या मुलीनं चीट केल तर तु काय करशील असं विचारल्यावर, टायगरला कोणी चीट करत असेल तर त्या मुलीची अवस्था खूपच वाईट होईल असं कृष्णा म्हणाली. दिशा पाटनी आणि कृष्णा यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. अनेकदा ती दिशाच्या फोटोंवर कमेंट करताना दिसते तसेच त्या दोघी अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. अशात तिनं दिशाबद्दल अशी प्रतिक्रिया देणं सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे.

प्रभासच्या 'साहो'वर अभिनेत्री लिसा रेनं केले गंभीर आरोप, म्हणाली...

दिशा पाटनीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, ती सध्या तिचा आगामी सिनेमा मलंगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘भारत’ प्रमाणे ‘मलंग’मध्येही दिशा स्टंट सीन करताना दिसणार आहे. या सिनेमात ती आदित्य रॉय कपूर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर टायगर श्रॉफ हृतिक रोशनसोबत ‘वॉर’ सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला ज्याला प्रेक्षाकांची वाहावा मिळाली आहे. या सिनेमात टायगर आणि हृतिक एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दिसणार आहेत.

दीपिका पदुकोण देणार गुड न्यूज! या VIRAL VIDEO मुळे रंगतेय लागली चर्चा

===================================================================

नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 1, 2019, 9:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading