JD च्या मृत्यूनंतर टायगर श्रॉफला दुःख अनावर, आठवणीत लिहिली भावुक पोस्ट

'बागी 3' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे संपूर्ण टीम खूश आहे. पण टायगर श्रॉफ मात्र खूप दुःखात आहे.

'बागी 3' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे संपूर्ण टीम खूश आहे. पण टायगर श्रॉफ मात्र खूप दुःखात आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 मार्च : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ एक अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखला जातो. काही दिवसापूर्वीच रिलीज झालेला त्याचा 'बागी 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या सिनेमातील त्याच्या अ‍ॅक्शन आणि अभिनयासाठी त्याचं खूप कौतुक केलं जात आहे. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे संपूर्ण टीम खूश आहे. तर दुसरीकडे टायगर श्रॉफ मात्र खूप दुःखात आहे. त्यानं सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. टायगर श्रॉफनं नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. ज्यात एक मांजर पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये टायगरनं लिहिलं, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांति देवो. 17 वर्षं एवढं प्रेम आणि आनंद देण्यासाठी धन्यवाद JD आशा करतो की तू माझ्या आयुष्यात परत येशील. जोपर्यंत तू माझ्या आयुष्यात परत येत नाहीस तोपर्यंत तू जिथेही असशील तिथे खूश राहा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. Birthday Special : हे पदार्थ आहेत आलिया भटचे वीक पॉइन्ट्स, तरीही राहते फिट!
    टायगरच्या या पोस्टवरुन दिसून येतं की, त्याचं त्यांच्या मांजरावर खूप प्रेम होतं आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला खूप दुःख झालं आहे. 6 मार्चला रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या 'बागी 3' या सिनेमानं मागच्या 9 दिवसांत 91 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होईल. मात्र कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडेच थिएटर्स बंद करण्यात आल्यानं सिनेमांच्या कमाईवर खूप मोठा परिणाम होणार आहे. 'त्या' बोल्ड वक्तव्यावर नेहा धुपियाचं लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण, म्हणाली... हातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...
    First published: