मुंबई, 07 जानेवारी : बॉलिवूडमध्ये अॅक्शन आणि डान्सिंग स्कीलमुळे स्वतःची वेगळी इमेज निर्माण करणारा टायगर श्रॉफ सध्या एका वेगळ्या कारणानं चर्चेत आला आहे. टायगरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात त्याला पोलिसांनी बेड्या घातलेल्या दिसत आहे. या फोटोंमध्ये टायगर श्रॉफ पोलिसांच्या गाडीत बसलेला दिसत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. टायगरनं असं केलं तरी काय ज्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
टायगर श्रॉफचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो त्याचा आगामी सिनेमा बागी 3 च्या सेटवरील असल्याचं स्पष्ट झालं आहे. टायगरच्या एका इन्स्टाग्राम फॅनपेजवर हे फोटो शेअर करण्यात आले. याशिवाय या सेटवरील त्याचे काही व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात त्याच्या आजूबाजूला बरीच गर्दी झालेली दिसत आहे. सध्या टायगर या सिनेमाच्या शूटिंगसाठी जयपूरमध्ये आहे.
रोमान्स... थ्रील... आणि मर्डर... पाहा थरारक Malang Trailer

टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अॅक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी मागच्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करत आहे. नुकतंच या सिनेमाचं शूट सुरू झालं आहे. बागीमध्ये टायगर श्रद्धा कपूरसोबत रोमान्स करताना दिसला होता. तर बागी 2 मध्ये तो दिशा पाटनीसोबत दिसला होता. त्यानंतर आता बागी 3 मध्ये पुन्हा एकदा श्रद्धा कपूर दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग जयपूरमध्ये सुरू असून या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात टायगरला पोलिस अटक करताना दिसत आहेत.
'मी प्रेग्नन्ट असेन तर...', पत्रकारच्या प्रश्नावर दीपिका पदुकोण भडकली
बागी 3 मध्ये टायगर श्रॉफसोबतच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खाननं केंल आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अॅक्शन सीन्स असणार आहेत.
बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप
VIDEO : नेहा पेंडसेनं लग्नात घेतला असा भन्नाट उखाणा की, ऐकून नवराही लाजला
दोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.