मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

टायगर श्रॉफनं चोरली स्पायडरमॅनची ‘ही’ गोष्ट; व्हिडीओ पाहून दिशा पटानी म्हणाली...

टायगर श्रॉफनं चोरली स्पायडरमॅनची ‘ही’ गोष्ट; व्हिडीओ पाहून दिशा पटानी म्हणाली...

आपल्या धमाकेदार अॅक्शन सीननं प्रेक्षकांना चकित करणारा टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 11 मार्च: आपल्या धमाकेदार अॅक्शन सीननं प्रेक्षकांना चकित करणारा टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनयासोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी देखील त्यानं असाच एक अॅक्शन करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क स्पायडरमॅन (Spiderman) सारखे अॅक्शन करताना दिसत आहे. (Tiger shroff flying kick)

टायगरनं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये तो सुपरहिरो स्पायडरमॅन प्रमाणे स्पिनिंग किक मारताना दिसत आहे. “मी माझ्या आगामी चित्रपटासाठी स्पायडरमॅनचे काही मूव्ह चोरले तर चालतील का?” अशा आशयाची गंमतीशीर कॉमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे. त्याच्या या व्हिडीओवर अभिनेत्री दिशा पटानी हिनं देखील क्लॅपिंगचे इमोजी पोस्ट करुन त्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत 30 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा - Birthday Special: इंजिनियरिंग करणारी पूनम पांडे का झाली पॉर्नस्टार?

टायगर श्रॉफचं नाव अनेकदा स्पायडरमॅनशी जोडलं जातं. तो अनेकदा चित्रपटांमध्ये हुबेबुह स्पायडरमॅन प्रमाणेच अॅक्शन सीन करताना दिसतो. शिवाय स्पायडरमॅन होमकमिंग, स्पायडरमॅन फार फ्रॉम होम आणि  अॅव्हेंजर्स एंडगेम या सुपरहिरोपटांच्या हिंदी डबिंगमध्ये त्यानं स्पायडरमॅन या व्यक्तिरेखेला आवाज दिला होता.

First published:

Tags: Disha patani, Tiger Shroff