VIDEO : करिश्मा कपूरच्या गाण्यावर टायगरचा धम्माल डान्स, वाचा काय म्हणाली दिशा पाटनी

VIDEO : करिश्मा कपूरच्या गाण्यावर टायगरचा धम्माल डान्स, वाचा काय म्हणाली दिशा पाटनी

सोशल मीडियावरील अनेक चाहत्यांसोबतच अभिनेत्री दिशा पाटनी सुद्धा टायगरच्या डान्सची चाहती आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अप्रतिम डान्सिंग स्किलसाठी ओळखला जातो. तो अनेकदा त्याचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियावरील त्याच्या अनेक चाहत्यांसोबतच अभिनेत्री दिशा पाटनी सुद्धा त्याच्या डान्सची चाहती आहे. इतर चाहत्यांप्रमाणे ती सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया देत असते. टायगरनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

टायगरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो करिश्मा कपूरचा सिनेमा ‘दिल तो पागल है’चं पॉप्युलर गाणं ‘ले गई, ले गई’ वर डान्स करताना दिसत आहे. त्यानं व्हाइट कलरची हुडी आणि मॅचिंग कार्गो पॅन्ट घातली आहे. या डान्सची कोरिओग्राफी ओरिजनल साँगपेक्षा खूपच वेगळी आहे. टायगरचा हा व्हिडीओ दिशा पाटनीला खूप आवडला आहे. तिनं यावर कमेंट करताना हग करणारा एमोजी पोस्ट केला आहे. हे ओरिजनल गाणं अभिनेत्री करिश्मा कपूरवर चित्रीत करण्यात आलं आहे.

'हे' आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते, सलमानची फी ऐकून व्हाल थक्क!

 

View this post on Instagram

 

Old is gold ... loved this era and this song! Anddd love these Guy's #choreography🕺 @piyush_bhagat @swainvikram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तो त्याचा आगामी सिनेमा ‘बागी 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर दिग्दर्शक अहमद खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याआधी त्यांनी ‘बागी 2’चं सुद्धा दिग्दर्शन केलं होतं. दिशा बद्दल बोलायचं तर तिचा मलंग सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय तिनं नुकताच एकता कपूरचा सिनेमा साइन केला आहे ज्याचं नावं अद्याप गुलदस्त्यात आहे.

...आणि शूटिंगच्या पहिल्याच दिवशी 'छपाक'च्या सेटवर ढसाढसा रडली दीपिका पदुकोण

 

View this post on Instagram

 

@tigerjackieshroff 🔥

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

टायगरचा नुकताच रिलीज झालेला वॉर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या सिनेमानं अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले. यात त्यानं त्याचा डान्सिंग गुरु हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांन केलं होतं. या सिनेमानं आतापर्यंत 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

KBC स्पर्धकानं केलं ऐश्वर्याचं कौतुक, अमिताभ बच्चननी व्यक्त केली नाराजी

==========================================================

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

First Published: Oct 26, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading