धम्माल...मायकल जॅक्सन की टायगर श्रॉफ हा VIDEO पाहून तुम्हीच ठरवा!

धम्माल...मायकल जॅक्सन की टायगर श्रॉफ हा VIDEO पाहून तुम्हीच ठरवा!

बॉलिवूडमध्ये आपल्या स्टंट आणि डान्ससाठी टायगर श्रॉफ ओळखला जातो. त्यांचे स्टंट हे जेव्हढे पाहण्यासारखे असतात तेव्हढाचं त्याचा डान्सही पाहण्यासारखा असतो.

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये आपल्या स्टंट आणि डान्ससाठी टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ओळखला जातो. त्यांचे स्टंट हे जेव्हढे पाहण्यासारखे असतात तेव्हढाचं त्याचा डान्सही पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावरही टायगर आपल्या डान्स आणि स्टंटचे व्हिडीओ कायम टाकत असतो आणि त्याला तुफान प्रतिसादही मिळतो. टायगरने आपल्या Instagramवर नुकताच डान्सचा एक व्हिडीओ टाकला. त्यात तो मायकल जॅक्सनसारखाच डान्स करतांना दिसतोय. त्याने आपल्या व्हिडीओसोबत मायकलचाही व्हिडीओ जोडलाय. या व्हिडीओवर बॉलिवूड स्टार्सही प्रतिक्रिया देत आहेत.मायकल हा टायगरचा आयकॉन आहे. त्यामुळे तो कायम त्याची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र या व्हिडीओत तो हुबेहूब मायकलची अॅक्शन करत असल्याने खरच त्या दोघांमधला फरक ओळखणं कठीण असल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

दिशा पटनीचा 'हॉट' PHOTO व्हायरल, टायगरच्या बहिणीने दिली 'ही' प्रतिक्रीया

टायगरचा बागी-3 हा चित्रपट लवकरच येणार असून त्याच्यासोबत श्रद्धा कपूर असणार आहे. श्रद्धाने टायगरच्या या व्हिडीओवर 'टू गुड' अशी  कमेंट केलीय. टायगर  ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) वॉरमध्येही दिसला होता. त्याच्या भूमिकेचं आणि कामाचं सगळ्यांनीच खूप कौतुक केलं. त्याने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा पल्ला गाठलाय.

दोघांच्याही चाहत्यांसाठी हा सिनेमा कोणत्याही ट्रीटपेक्षा कमी नव्हता. बाइकपासून ते प्लेनपर्यंत प्रत्येक स्टंटमध्ये टागर आणि हृतिक आपली किमया दाखवताना त्यात दिसले.

First published: November 17, 2019, 8:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading