टायगर म्हणाला, ‘शाळेत असतानापासूनच मला श्रद्धा खूप आवडायची. पण त्यावेळी माझ्याकडे तेवढी हिंमत नव्हती. त्यामुळे असं झालं की श्रद्धा याबद्दल कधीच समजलं नाही.’ टायगर श्रॉफच्या अगोदर वरुण धवननंही कॉलेजमध्ये असताना त्याला श्रद्धा कपूरवर क्रश होतं. पण त्यावेळी त्यालाही त्याच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत. VIDEO: डान्स करताना अचानक आला आवाज आणि खटकन मोडलं अभिनेत्रीच्या पायचं हाड टायगर आणि वरुण दोघांनीही त्यांना श्रद्धा कपूरवर क्रश असल्याचं सांगितलं असलं तरीही आता त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे जोडीदार आहेत. टायगर दिशा डेट करतो असं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे वरुण धवन लवकरच त्याची बालमैत्रिण नताशा दलालशी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत आहे. ऑनस्क्रीन केमिस्ट्री बद्दल बोलायचं तर वरुण आणि टायगर या दोघांसोबतही श्रद्धाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टायगर श्रॉफचा बागी फ्रेंचायजीचा हा तिसरा जबरदस्त अॅक्शन सिनेमा असणार आहे. ‘बागी 3’चं दिग्दर्शन अहमद खाननं केलं आहे. तर निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे. या सिनेमात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अॅक्शन सीन्स असणार आहेत. फोटोग्राफरच्या पायावरुन गेली वरुण धवनची कार, पाहा अभिनेत्यानं काय केलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Shraddha kapoor, Tiger Shroff