दिशा पाटनी झाली टायगरच्या अ‍ॅब्स लुकची दिवानी, PHOTO वर केली ‘ही’ कमेंट

दिशा पाटनी झाली टायगरच्या अ‍ॅब्स लुकची दिवानी, PHOTO वर केली ‘ही’ कमेंट

टायगर आणि दिशाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरू होत्या.

  • Share this:

मुंबई, 21 फेब्रुवारी : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरीही दोघं अनेकदा एकत्र डिनर डेटला गेलेलं पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच ही जोडी मागच्या काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. पण आता दिशा पाटनी टायगरच्या फोटोवर कमेंट केल्यानं चर्चेत आली आहे.

टायगर आणि दिशाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या मात्र त्यानंतरही अनेकदा दोघंही एकत्र दिसल्यानं या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. टायगरनं नुकतंच डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. त्याचा एक फोटो त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये टायगरचे अ‍ॅब्स दिसत आहेत. टायगरच्या या फोटोवर कमेंटमध्ये दिशानं फायर इमोजी पोस्ट केला आहे.

VIDEO : शत्रुघ्न सिन्हा गूपचूप गेले पाकिस्तानला, सोशल मीडियावर चर्चा

 

View this post on Instagram

 

📸✨ @dabbooratnani @manishadratnani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

सोशल मीडियावर सध्या दिशाच्या या कमेंटची खूप चर्चा होताना दिसत आहे. दिशा टायगरच्या अ‍ॅब्सवर फिदा असलेली पाहायला मिळाली. दिशा व्यतिरिक्त तिची बहिण खुशबू हिने सुद्धा टायगरच्या फोटोवर कमेंट केली आहे.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘बागी 3’मध्ये अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात टायगर सोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर दिशा लवकरच सलमान खानच्या 'राधे' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला तिच्या 'मलंग' सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

मेहंदी है सजनेवली...! बॉलिवूडचं आणखी एक कपल अडकणार लग्नाच्या बेडीत

सनी लिओनीकडे 74 वर्षीय अभिनेत्यानं मागितला पर्सनल नंबर, आणि...

First published: February 21, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading