Home /News /entertainment /

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपची पुन्हा एकदा चर्चा! UNSEEN PHOTOS व्हायरल

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपची पुन्हा एकदा चर्चा! UNSEEN PHOTOS व्हायरल

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी अनेकदा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसतात. अलीकडेच त्यांचे काही दुबईमधील फोटो व्हायरल झाले आहेत

मुंबई, 18 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) या दोघांच्या रिलेशनशिपबाबत बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा होत असते. टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा गेले अनेक महिने सुरू आहेत. नुकताच त्यांचा एक दुबईमधील फोटो समोर आला आहे. टायगर आणि दिशा दुबईत (Dubai) एमएमए इव्हेंटमध्ये (MMA Event) सहभागी होण्यासाठी गेले आहेत. विशेष म्हणजे टायगरसोबत त्याची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आणि आई आयशा श्रॉफ(Ayasha Shroff) देखील आहेत. दुबईमधल्या कार्यक्रमात दोघही चाहत्यांबरोबरही पोज देताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. टायगर आणि दिशा यांनी कधीच त्यांच्या नात्याबाबत अधिकृत भाष्य केलं नाही आहे. माध्यमांसमोर त्यांनी अजून आपलं नातं स्वीकारलं नसून अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मात्र दोघंही एकमेकांसोबत दिसत असतात. दोघही याला खास मैत्री म्हणत असून माध्यमांसमोर मात्र त्यांचं नातं लपून राहिलेलं नाही. सध्या दोघीनींही आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं असून सुट्टी एन्जॉय करत आहेत.
त्यांचे या कार्यक्रमातील काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
दरम्यान, वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर नुकतीच दिशा पाटनी 'मलंग'(Malang) या चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) तसंच अनिल कपूर, कुणाल खेमू आणि एली अॅव्हराम ही स्टार कास्ट होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सूरी याने केलं होतं. तर लवकरच दिशा सलमान खान (Salman Khan) बरोबर ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' या चित्रपटात दिसणार आहे. प्रभुदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्या देखिल भूमिका आहेत. त्याचबरोबर दो व्हिलन हा चित्रपट देखील लवकरच येणार आहे. टायगर श्रॉफ 'हिरोपंती 2' आणि 'गणपत' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Disha patani, Tiger Shroff

पुढील बातम्या