मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नानंतर पहिल्यांदाच सलमानसोबत दिसली कतरिना; या कारणासाठी राजधानीला रवाना

लग्नानंतर पहिल्यांदाच सलमानसोबत दिसली कतरिना; या कारणासाठी राजधानीला रवाना

Salman Khan

Salman Khan

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    मुंबई, 2 फेब्रुवारी: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या ‘टायगर’ आणि ‘टायगर 2’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरले होते. आता प्रेक्षक ‘टायगर 3’ चित्रपटाची वाट पाहत आहेत. ‘टायगर 3’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. मात्र, कोरोनामुळे ते थांबवण्यात आल आहे. यामध्ये सलमान आणि कतरिनाची जोडी फॅन्सना पाहायला मिळणार आहे. सलमानचा बिग बॉस (Bigg boss) शो संपला आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारीपासून तो टायगर 3 चित्रपटाच्या उरलेल्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये (Yashraj films studio) हे शूटिंग होईल. हे शूटिंग संपल्यानंतर आऊटडोर शूटिंग होणार आहे. देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होतोय. त्यामुळे सलमान खान आणि कतरिना कैफ दोघंही 14 फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत (delhi) या चित्रपटाचं शूटिंग (shooting) करणार आहेत. यशराज फिल्म्स आणि मनीष शर्मा यांच्या टीमने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी टाईमटेबल (timetable) तयार केलं आहे. त्यानुसार, टायगर 3 चित्रपटातील काही सीन नवी दिल्लीतील वास्तविक ठिकाणी शूट केले जातील. "टायगर 3 चित्रपटाचं शूटिंग या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी, सलमान-कतरिना 14 फेब्रुवारीपासून दिल्लीत चित्रपटातील महत्वाच्या सीनचं शूटिंग करणार आहे. यावेळी यशराज फिल्म्सकडून कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. सलमान आणि कतरिना बहुतेक 12 किंवा 13 तारखेला सकाळी दिल्लीला जाणार आहेत,” अशी माहिती पिंकव्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. “यशराज फिल्म्सने एवढ्या मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगचं वेळापत्रक मॅनेज करण्यासाठी महामारीच्या काळात प्रशंसनीय काम केलं आहे. आता दिल्लीत कोरोनाचे (covid-19 protocol) कडक नियम पाळून शूटिंग केलं जाणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम यासाठी तयार आहे. चित्रपटासाठी हे अत्यंत महत्त्वाचं वेळापत्रक आहे आणि सलमान-कतरिना दिल्लीत 10-12 दिवस शूटिंग करणार आहेत. शूटिंगबद्दल अधिक माहिती बाहेर येऊ नये, यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दिल्लीत शेड्यूल संपल्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईल. विशेष म्हणजे या चित्रपटाचं शूटिंग वर्षभर चाललंय, असं म्हणायला हरकत नाही. कारण टायगर 3 च्या पहिल्या शूटिंगचा दिवस गेल्या वर्षी 10 मार्चच्या आसपास होता. टायगर 3 हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठा अ‍ॅक्शन चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. याचं अंदाजे बजेट 350 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे आधीचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. दरम्यान, चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरू होणार आहे आणि शूटिंगची तारीख बघितल्यास कतरिना कैफ लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे विकीसोबत नाही तर सलमानसोबत घालवणार आहे.
    First published:

    Tags: Big boss, Bigg Boss OTT, Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Salman khan

    पुढील बातम्या