नुकताच झी टीव्हीवर 'ती परत आलीये' ही भयपट आणि रहस्यमयी मालिका आपल्या भेटीला आली आहे. मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे सर्व लोक मालिकेत गुंतून जातात. मालिकेतील बाहुलीने तर सर्वांचा थरकाप उडवला आहे. अनेकांनी ती बाहुली दाखवू नये अशीही मागणी केली होती. बाहुलीच्या डोळ्यांनी ती जिवंत बाहुली असल्याची अनुभूती येते. त्यामुळे बघणाऱ्याला घाबरण्यास होतं. मालिकेत अनेकवेळा असे भयानक दृश्ये दाखवली जातात. मात्र ती कशी शूट केली जात असतील याबद्दल लोकांच्या मनात एक कुतूहल असत. प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं हे भयपट मालिका आणि चित्रपट कसे चित्रित होत असतील. म्हणून झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ती परत आलीये' मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (हे वाचा:नाट्यगृह सुरू करण्याचा मुहूर्तही मिळाला, 'या' दिवशी वाजणार तिसरी घंटा!) या व्हिडीओमध्ये मालिकेतील विविध दृश्ये दाखवण्यात आली आहे. मॅन्डीने नुकताच मालिकेतून निरोप घेतला. त्याचासुद्धा मालिकेत रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. मालिकेत मॅन्डीचा मृतेदह स्विमिंगपूलमध्ये आढळून आला. त्यामुळे त्याच्या सर्वच मित्रांना धक्का बसला होता.शिवाय भितीही निर्माण झाली होती. मालिकेतील मॅन्डीच्या मृत्यूचा हा सीन कसा चित्रित केला गेला हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. कॅमेरा कसे लावले जातात. कलाकार कोणत्या पद्धतीने हे शॉट्स देतात हे या व्हिडीओमुळे आपल्या लक्षात येत आहे. शिवाय बाहुलीला सीनमध्ये कस आणलं जात. कलाकारांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या डोळ्यातील भाव कसे कॅमेरात टिपले जातात. हेही यामध्ये दिसून येत आहे. (हे वाचा:Bigg Boss Marathi: तिसऱ्या पर्वाचं सर्वात मोठं सरप्राईज; पाहा काय आहे'Temptation) सध्या मालिकेत खूपच इंट्रेस्टिंग भाग सुरु आहे. मालिकेमध्ये नुकताच मॅन्डीचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा या विचाराने सर्वांनाच धडकी भरली आहे. त्यात गरोदर रोहिणीला व्हॅनिला आईस्क्रीम खाण्याची हुक्की आली आहे. तिच्यासाठी सर्वजण काही ना काही प्रयत्न करत आहेत. सर्वांना एका पाठोपाठ एक होत असलेल्या खुनाचं टेन्शन आणि त्यात गरोदर रोहितची काळजी. अशातच सायलीने काल इतक्या दिवसांनंतर आपल्या आईचा आवाज फोनवर ऐकला मात्र दुर्दैवाने लगेच रेंज जाते. आणि त्यांचं बोलणं होत नाही. अशा विविध घटना सध्या या मालिकेत घडत आहेत. प्रत्येक एपिसोडनुसार प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.