Home /News /entertainment /

'ती परत आलीये' फेम सत्त्या झळकणार नव्या मालिकेत! साकारणार ही भूमिका

'ती परत आलीये' फेम सत्त्या झळकणार नव्या मालिकेत! साकारणार ही भूमिका

झी मराठीवरील 'ती परत आलीये' (Ti Parat Aaliye) ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या रहस्यमयी मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं.

  मुंबई, 25 जानेवारी-   झी मराठीवरील 'ती परत आलीये'   (Ti Parat Aaliye)  ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या रहस्यमयी मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. दररोज मालिकेत येणाऱ्या ट्विस्टने चाहते या मालिकेला प्रचंड पसंती देत होते. या मालिकेतील कलाकारांनासुद्धा मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे श्रेयस राजे   (Shreyas Raje)  होय. श्रेयसच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. तो लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे. झी मराठीवर 'ती परत आलीये' ही रहस्यमयी मालिका आपल्या भेटीला आली होती. मालिकेच्या अंगावर शहारा आणणाऱ्या रहस्यमयी कथानकाने चाहत्यांना खिळवून ठेवलं होतं. मालिकेत असणाऱ्या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती. सर्वच कलाकारांना मोठी पसंती मिळाली होती. यात सतेज हे पात्रसुद्धा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडलं होतं. अनेक तरुणी हँडसम सतेजच्या चाहत्या बनल्या आहेत. ही भूमिका अभिनेता श्रेयस राजेने साकारली होती. 'ती परत आलीये' या मालिकेने काही दिवसांपूर्वी आपला निरोप घेतला होता. त्यांनतर चाहते श्रेयसला प्रचंड मिस करत होते. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता लवकरच नव्या मालिकेतून आपल्या भेटीला येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांना भेटायला येत आहेत.विशेष म्हणजे या सर्व मालिका रिमेक असणार आहेत. दरम्यान 'लग्नाची बेडी'   (Lgnachi Bedi)  या आगामी मालिकेने सर्वांची उत्सुकता वाढवली आहे. ही मालिका हिंदीतील लोकप्रिय 'गुम है किसी के प्यार मैं' या मालिकेचा रिमेक असणार आहे. या मालिकेत श्रेयस राजे झळकणार आहे. श्रेयस या मालिकेत कांता ही भूमिका साकारणार आहे. चाहते श्रेयसला नव्या भूमिकेत नव्या अंदाजात पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. (हे वाचा:लग्नाची बेडी' मालिकेत कोणता कलाकार साकारणार कोणती भूमिका? पाहा संपूर्ण LIST) मालिकेत आणखी कोण-कोणते कलाकार असणार?- 'लग्नाची बेडी' मालिकेत श्रेयस राजे व्यतिरिक्त आणखी तगडी स्टारकास्ट असणार आहे. या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून संकेत पाठक असणार आहे. यामध्ये तो पोलीस अधिकारी राघव रत्नपारखीची भूमिका साकारत आहे. मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री सायली देवधर असणार आहे. ती यामध्ये सिंधूची भूमिका साकारत आहे. याशिवाय रेवती लेले,सुमुखी पेंडसे, सुषमा मुरुडकर,रसिका धामणकर, मीनल बाळ, गंधार खरपुडीकर, मिलिंद अधिकारी इत्यादी कलाकार असणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या