ठुमरीची राणी गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड

ठुमरीची राणी गिरीजा देवी काळाच्या पडद्याआड

प्रख्यात शास्त्रीय गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरीजा देवी यांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होतंय. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

  • Share this:

25 आॅक्टोबर : प्रख्यात शास्त्रीय गायिका, ठुमरीसम्राज्ञी गिरीजा देवी यांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होतंय. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण गिरीजा देवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोलकात्यातील बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जमीनदार कुटुंबात ८ मे १९२९ रोजी जन्मलेल्या गिरीजादेवी सेनिया आणि बनारस घराण्याच्या गायिका होत्या. १९४९ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री, १९८९ मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. १९७७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी त्या काळचे ज्येष्ठ गायक आणि सारंगीवादक सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडे ख्याल आणि टप्पा गायनाचे धडे गिरवले. संगीतातील त्यांचे पहिले गुरू हे त्यांचे वडील होते. याद रहे या चित्रपटात त्यांनी नवव्या वर्षी काम केले आणि श्रीचंद्र मिश्रा यांच्याकडे शिक्षण सुरू ठेवले.

शास्त्रीय संगीतातील ठुमरी गायन प्रकारात त्यांचा विशेष नावलौकिक होता. त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे त्यांना ठुमरीची राणी म्हणूनही ओळखलं जात होतं. ठुमरीशिवाय कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत आदी विविध गायन प्रकारातही त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. आप्तमंडळींमध्ये आपाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गिरीजा देवी यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 11:49 AM IST

ताज्या बातम्या