S M L

ठग्ज आॅफ हिंदोस्तान : ३०० कोटींच्या सिनेमाचं आता बाॅक्स आॅफिसवर लक्ष

काऊंट डाऊन संपलं. आज ठग्ज आॅफ हिंदोस्तान रिलीज झाला. यशराज फिल्मचा हा सर्वात महागडा सिनेमा.

Updated On: Nov 8, 2018 01:53 PM IST

ठग्ज आॅफ हिंदोस्तान : ३०० कोटींच्या सिनेमाचं आता बाॅक्स आॅफिसवर लक्ष

मुंबई, 8 नोव्हेंबर : काऊंट डाऊन संपलं. आज ठग्ज आॅफ हिंदोस्तान रिलीज झाला. यशराज फिल्मचा हा सर्वात महागडा सिनेमा. जवळजवळ 300 कोटींचा खर्च सिनेमावर झालाय. आता हा सिनेमा बाॅक्स आॅफिसवर किती कमाई करतोय हा मोठा प्रश्न आहे. कारण 100 कोटी हल्ली बरेच सिनेमे कमावतात. पण ठग्ज आॅफ हिंदोस्तानला खूप मोठी मजल मारायचीय.


अगर आजादी है गुन्हा, तो मंजूर है सजा... असेच भारदस्त डायलाॅग्ज ऐकायला मिळणार आहेत. 1795मधली ही कथा. ब्रिटिश राजवटी विरोधात भारतीयांनी पुकारलेलं बंड. ते मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी नेमलेला फिरंगी. फिरंगी विरुद्ध आजाद असं फुंकलं गेलं रणशिंग.


हे सगळं पहायला मिळणार आहे नोव्हेंबरमध्ये. ' ठग्ज आॅफ हिंदोस्तान' सिनेमात. याचा ट्रेलर रिलीज झाला. लार्जर दॅन लाईफ शाॅट्स, जबरदस्त अॅक्शन्स, भारदस्त डायलाॅग्ज हे सर्व पाहून रसिक प्रेक्षक भारावूनच गेलेत. ट्रेलर इतका भव्य दिव्य, तर मग सिनेमा किती असेल, याचा विचार सगळे करतायत.

Loading...


यश चोप्रांच्या जन्मदिनी हा ट्रेलर रिलीज केला गेला. यशराज फिल्म्सच्या इतिहासात हा सर्वात महागडा सिनेमा आहे. सिनेमात आमिर आणि बिग बींच्या दरम्यान एक फाईट सीन आहे. आमिर तो स्वत:च करणार होते. बिग बींसाठी डबल्स वापरू, म्हणजे दुसरा कुणा तो शाॅट देईल असं दिग्दर्शकानं म्हटलं. पण अमिताभना ते अजिबात मान्य नाही. ते स्वत:च तो सीन शूट करणार असं म्हणाले आणि तसं केलंही.


75 वर्षांचे बिग बी फाईट सीन करणार, याचं दिग्दर्शकाला आश्चर्यच वाटलं. अगदी आमिर खाननंही त्यांना समजावलं. उलट आमिरसोबत बिग बींनी मला तो सीन स्वत: करायचाय म्हणून वादही घातला. सिनेमात तो फाईटिंग सीन खूप महत्त्वाचा आहे. सिनेमाचा हायलाईटच आहे. त्यामुळेच बिग बींना तो स्वत: करायचाय.


'ठग्ज आॅफ हिंदुस्तान' 3डी आणि आयमॅक्समध्ये रिलीज होईल. तामिळ आणि तेलगूमध्येही सिनेमा पाहता येईल. 2018चा हा सर्वात मोठा सिनेमा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 01:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close