'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या कमाईसाठी निर्मात्यांची नवी शक्कल

'संजू' चित्रपटाची बिझनेस स्टॅटर्जी वापरून निर्माते तिकिटांच्या दरात बदल करणार अाहेत. ठग्स ऑफ हिंदोस्तान पाहणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार का?

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2018 01:56 PM IST

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या कमाईसाठी निर्मात्यांची नवी शक्कल

मुंबई, 23 ऑक्टोबर: अमिताभ बच्चन आणि अामिर खान यांचा आगामी सिनेमा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सर्वत्र चर्चेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एक आश्चर्य वाटणारी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन आणि अामिर खान हे पहिल्यांंदा एकत्र सिनेमात दिसणार आहेत ही बातमी पसरताच अमिताभ आणि अामिर यांचं काम पाहण्यासाठी सिनेमाविषयी प्रेक्षकांचा उत्साह वाढत गेला.

यानंतर निर्मात्यांनी सिनेमाची कमाई वाढवण्यासाठी नवी शक्कल वापरण्याचा विचार केला आहे. ही बिझनेस स्टॅटर्जी याआधी रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटात वापरण्यात आली होती. 'संजू' सिनेमाचं एकूण बजेट 100 कोटी होतं. राजकुमार हिरानीने ही बिझनेस स्टॅटर्जी वापरल्यानंतर चित्रपटानं जवळपास 350 कोटींची कमाई केली. आता यशराज फिल्मसुद्धा याचा वापर करणार असल्याचं समजलं जातंय.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाची चर्चा आणि प्रेक्षकांमध्ये वाढलेली त्याची उत्सुकता पाहता सिनेमाच्या तिकिटाचे दर वाढवणार आहेत. यशराज फिल्म प्राॅडक्शनने स्टॅटर्जीनुसार तिकिटांचे दर 10 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजू सिनेमाच्या तुलनेत या चित्रपटाच्या तिकिटांचे दर जास्त असणार आहेत. याशिवाय सिनेमाचं ऑनलाईन बुकिंग चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पाच दिवस आधी सुरू करणार आहेत. 8 नोव्हेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार असून 3 नोव्हेंबरपासून सिनेमाचं ऑनलाईन तिकीट मिळणार  आहे.

अमिताभ बच्चन, अामिर खान यांच्या व्यतिरिक्त कतरिना कैफ, फतिमा सना शेख हे कलाकारसुद्धा चित्रपटात असल्याने सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा विश्वास दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांना आहे. साऊथचा प्रेक्षक हा त्यांच्या भाषेबद्दल खूप संवेदनशील आहे. म्हणूनच साऊथच्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. पण प्रेक्षकांच्या खिशाला कात्री बसणार असं दिसतंय.

दीपिकासाठी 'बाहुबली'नं नाकारली 6 हजार लग्नाची प्रपोजल्स?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2018 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...