मुंबई, 9 नोव्हेंबर : बहुचर्चित ठग्स आॅफ हिंदोस्तान रिलीज झाला. आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दिग्गज, 300 कोटींचा सिनेमा हे सर्व पाहून प्रेक्षकांनी सर्व थिएटर्स हाऊसफुल केली. सिनेमा फारच बकवास निघाला. पण नुसत्या आमिर आणि अमिताभ यांच्या नावाचा फायदा बाॅक्स आॅफिसला झाला.
पहिल्या दिवसाची कमाई झालीय 50 कोटी. पहिल्या दिवसाच्या कमाईत सिनेमानं बाहुबलीलाही मागे टाकलंय. बाहुबलीनं पहिल्या दिवशी 40 कोटी कमावले होते, तर राम रतन धन पायोनं 39 कोटी. दिवाळी असल्यानं ठग्स आॅफ हिंदोस्तानचं अॅडव्हान्स बुकिंग झालं होतं. 2 लाख रुपयाचं अॅडव्हान्स बुकिंग होतं.
या सिनेमावर चित्रपट समीक्षकांनीही प्रचंड टीका केलीय. सिनेमावर यशराजनं 300 कोटी खर्च केलेत.
निर्मात्यांनी सिनेमाची कमाई वाढवण्यासाठी नवी शक्कल वापरली. ही बिझनेस स्टॅटर्जी याआधी रणबीर कपूरच्या ‘संजू’ चित्रपटात वापरण्यात आली होती. 'संजू' सिनेमाचं एकूण बजेट 100 कोटी होतं. राजकुमार हिरानीने ही बिझनेस स्टॅटर्जी वापरल्यानंतर चित्रपटानं जवळपास 350 कोटींची कमाई केली.
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाची चर्चा आणि प्रेक्षकांमध्ये वाढलेली त्याची उत्सुकता पाहता सिनेमाच्या तिकिटाचे दर वाढवले आहेत. यशराज फिल्म प्राॅडक्शनने स्टॅटर्जीनुसार तिकिटांचे दर 10 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संजू सिनेमाच्या तुलनेत या चित्रपटाच्या तिकिटांचे दर जास्त असणार आहेत. याशिवाय सिनेमाचं ऑनलाईन बुकिंग चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पाच दिवस आधी सुरू झालं. 8 नोव्हेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. पण 3 नोव्हेंबरपासून सिनेमाचं ऑनलाईन तिकीट मिळतंय.
अमिताभ बच्चन, अामिर खान यांच्या व्यतिरिक्त कतरिना कैफ, फतिमा सना शेख हे कलाकारसुद्धा चित्रपटात असल्याने सिनेमा बॉक्स ऑफिसवर फायदा झाला आहे. साऊथचा प्रेक्षक हा त्यांच्या भाषेबद्दल खूप संवेदनशील आहे. म्हणूनच साऊथच्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला.
...म्हणून राणादाच्या पाठकबाईंना ट्रॅडिशनल लुकच पसंत