मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'शोले'च्या क्लायमॅक्समध्ये चालवली होती बंदुकीची खरी गोळी; गब्बर नव्हे 'या' व्यक्तीमुळे गेला असता अमिताभ यांचा जीव

'शोले'च्या क्लायमॅक्समध्ये चालवली होती बंदुकीची खरी गोळी; गब्बर नव्हे 'या' व्यक्तीमुळे गेला असता अमिताभ यांचा जीव

शोले

शोले

Throwback Bollywood Stories: 'शोले' हा बॉलीवूडमधील अशा यशस्वी चित्रपटांपैकी एक समजला जातो, ज्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. इतक्या वर्षानंतर आजही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 18 मार्च- 'शोले' हा बॉलीवूडमधील अशा यशस्वी चित्रपटांपैकी एक समजला जातो, ज्याला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं होतं. इतक्या वर्षानंतर आजही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम आहे. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागताच प्रत्येक पिढी आवर्जून पाहाते. या चित्रपटाशी संबंधित अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत.आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर हा किस्सा सांगितला होता. हा किस्सा ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. बिग बींनी सांगितलं होतं की, शोलेच्या क्लायमॅक्स सीनमध्ये चुकून खरी गोळी चालवण्यात आली होती. ज्यामध्ये ते थोडक्यात बचावले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बंदूक 'गब्बर' म्हणजेच अमजद खानने नव्हे तर इतर कोणीतरी गोळी चालवली होती.

(हे वाचा:पतीने सोडलं, बॉयफ्रेंडने वेश्या व्यवसायात ढकललं; शेवटी अभिनेत्रीचा मृतदेह न्यायलाही मिळाले नाहीत लोक )

भयानक गोष्ट म्हणजे खरी गोळी अमिताभ बच्चन यांच्या अगदी जवळून गेली होती. आता ती गोळी कोणी चालवली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही खरी गोळी कुणी दुसऱ्याने नव्हे तर वीरु अर्थातच धर्मेंद्रने शोलेच्या क्लायमॅक्समध्ये उडवली होती. धर्मेंद्र यांच्या बंदुकीतून सुटलेली ही गोळी अमिताभ बच्चन यांच्या कानाजवळून गेली होती. म्हणजेच या घटनेत अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावला होता.

या सीनबाबत सांगताना अमिताभ यांनी म्हटलेलं की, 'या घटनेनंतर त्यांना धक्का बसला होता. बराच वेळ काय घडलं हे कळायचं बंद झालं होतं. ते पुढे म्हणाले, आम्ही क्लायमॅक्स सीन शूट करत होतो. तेव्हा धर्मेंद्र खाली उभे होते आणि मी टेकडीच्या शिखरावर होतो. धरमजींना दारूगोळा आणि गोळ्या पटकन उचलून सोबत ठेवाव्या लागत होत्या. पण, ते गोळ्या उचलत असताना त्या सतत खाली पडत होत्या. अशा स्थितीत पुन्हा पुन्हा रिटेक होत होते. हे सीन्स पुन्हा पुन्हा केल्याने धर्मेंद्र यांना प्रचंड वैताग आला होता.

त्यामुळे रागात येऊन त्यांनी खाली पडलेल्या गोळ्या आपल्या बंदुकीत भरल्या आणि चालवायला सुरुवात केली. त्यातीलच एक गोळी माझ्या कानाच्या अगदी जवळून गेली, पण ती खरी गोळी होती. आणि हे धर्मेद्र यांनासुद्धा नंतरच समजलं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा जीव थोडक्यात बचावल्याचं ते सांगतात.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Dharmendra deol, Entertainment