News18 Lokmat

ब्रिजवरून उडी मारून या अभिनेत्याने केली आत्महत्या, मरणापूर्वी लिहिलं भावुक पत्र

मी स्वतःला एक चांगला माणूस समजत होतो. पण मला आता हे कळलं आहे की मी चांगला माणूस नाहीये. आयुष्यभर मी वाईट माणूसच राहिलो आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 12:00 PM IST

ब्रिजवरून उडी मारून या अभिनेत्याने केली आत्महत्या, मरणापूर्वी लिहिलं भावुक पत्र

न्यूयॉर्क 17 मे - हॉलिवूड अभिनेता इसाक कॅपीने ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या केली. इसाक ४२ वर्षांचा होता. थोर सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेमुळे इसाकला प्रसिद्धी मिळाली. यूएसए टूडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इसाकने एरिजोनाच्या फ्लॅगस्टाफ जवळील एका पुलावरून उडी मारून आत्महत्या केली.

रिपोर्टनुसार, दोन मुलांनी इसाकला उडी मारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नाही. एका वाहनाला धडकून इसाकचा जागीच मृत्यू झाला. अभिनेत्याने आत्महत्येपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हृदयद्रावक मेसेज केले.

…म्हणून शाहरुखच्या पार्टीत विकी कौशलसोबत या कलाकारांनाही वाटत होतं पडद्याच्या मागे जाऊन लपावं

त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘गेल्या एक आठवड्यामध्ये मी अनेकप्रकारे आत्मपरीक्षण केलं. मी स्वतःला एक चांगला माणूस समजत होतो. पण मला आता हे कळलं आहे की मी चांगला माणूस नाहीये. आयुष्यभर मी वाईट माणूसच राहिलो आहे.’ या पोस्टमध्ये त्याने दारु आणि अमली पदार्थांच्या आहारी जाण्याच्या संघर्षाबद्दलही आमलं मन मोकळं केलं. त्याने देवाचे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्या सर्वांची माफी मागितली ज्यांचं त्याने अजाणतेपणी मन दुखावलं.

शुटिंगवेळी या 5 अभिनेत्यांचा झालेला अपघात, विकीला तर पडले 13 टाके

Loading...
 

View this post on Instagram
 

Beware the man that has nothing to lose, for he has nothing to protect.


A post shared by Isaac Kappy (@isaackappy) on

इसाक कॅपीने अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिक साकारल्या आहेत. २०११ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर थोर सिनेमात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. याशिवाय २००९ मध्ये आलेल्या टर्मिनेटर साल्वेशनमध्ये त्याने बारबारोसा आणि याचवर्षी आलेल्या फॅनबॉइज सिनेमात त्याने गरफनकेल नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

घटस्फोटानंतर स्वतंत्र्य आयुष्य जगत आहेत या 5 बॉलिवूड स्टार्सच्या मुली

SPECIAL REPORT : मग, तरीही राज ठाकरेंनी ठाण्यात सभा का घेतली नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...