2018चे सण,लाँग वीकेण्ड आणि मोठे सिनेमे

2018चे सण,लाँग वीकेण्ड आणि मोठे सिनेमे

2017 सिनेमांसाठी फार ग्रेट नाही ठरलं. पण 2018कडून अपेक्षा आहे. बरेच मोठे सिनेमे रिलीज होतायत आणि ते मोठ्या वीकेण्डलाच रिलीज होतायत.

  • Share this:

08 जानेवारी : 2017 सिनेमांसाठी फार ग्रेट नाही ठरलं. पण 2018कडून अपेक्षा आहे. बरेच मोठे सिनेमे रिलीज होतायत आणि  ते मोठ्या वीकेण्डलाच रिलीज होतायत.

होळीच्या रंगात रंग भरायला येतोय सुशांत सिंग 'ड्राइव्ह' सिनेमा घेऊन. हाॅलिवूड सिनेमा 'ड्राइव्ह'चा हा रिमेक आहे. सुशांतसोबत जॅकलीन फर्नांडिस आहे. 2 मार्चला सिनेमा रिलीज होतोय. 'दोस्ताना'फेम दिग्दर्शक तरुण मनसुखानीनं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

ईदची सुट्टी आणि सलमानचा सिनेमा हे समीकरण ठरलेलंच आहे. आता याही वर्षी जूनमध्ये रेस 3 रिलीज होतोय. यात सैफ अली खानच्या जागी सलमान आलाय. सोबत जॅकलीन फर्नांडिस, बाॅबी देओल, अनिल कपूर आहेत. हाही सिनेमा  लाँग वीकेण्डलाच रिलीज होतोय.

आमिर खान वर्षातून एकच सिनेमा करतोय. पण तोच सुपरडुपर हिट होतो. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये येतोय ठग्ज आॅफ हिंदोस्तान. त्यात डबल ट्रीट म्हणजे आमिर आणि बिग बी एकत्र आहेत. सिनेमात फातिमा सना शेख आणि कतरिना यांच्याही भूमिका आहेत. 7 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

आणि डिसेंबरचा लाँग वीकेण्ड नेहमीप्रमाणे शाहरूख खाननं बुक केलाय. त्याचा झिरो सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होतोय. यात त्यानं बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारलीय. ख्रिसमसच्या सुट्टीचा फायदा सिनेमाला मिळणार असं दिसतंय.

 

First published: January 8, 2018, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading