मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raj Kundra Arrested: धक्कादायक! या व्हाट्सअप चॅटमुळे झाली राज कुंद्राला अटक

Raj Kundra Arrested: धक्कादायक! या व्हाट्सअप चॅटमुळे झाली राज कुंद्राला अटक

. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड (Pornography Case) करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 20 जुलै- बॉलिवूडसह (Bollywood) सर्वत्रचं सध्या मोठी खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड (Pornography Case) करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडे राज कुंद्राविरुद्ध सबळ पुरावे आहेत. ज्या व्हाट्सअप चॅटवरून (WhatsApp Chat) तो दोषी ठरू शकतो ते व्हाट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. आणि याबद्दल महत्वाची माहितीसुद्धा समोर आली आहे. मुंबई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील जी कंपनी पोर्न व्हिडीओ तयार करते, आणि इंटरनेटवर अपलोड करते. त्याच्यासोबत राज कुंद्राचे व्हाट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळेचं राज कुंद्राला अटक झाली आहे. एका प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीशी राजने व्हाट्सअप चॅट केले आहेत. यामध्ये राज आणि प्रदीप यांच्यात अश्लील चित्रफितसंबंधी बोलणं झालं होतं. तसेच या अश्लील चित्रफितमध्ये होणाऱ्या नफ्यावरसुद्धा व्हाट्सअप चॅट करण्यात आलं होतं.इतकचं नव्हे तर दररोज सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्रायबरबद्दलही यामध्ये बोलण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे या अश्लील व्हिडीओमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनी किती रक्कम घेतली यावरही व्हाट्सअप चॅटमध्ये बोलण्यात आलं होतं. (हे वाचा:दोषी आढळल्यास शिल्पा शेट्टीच्या पतीला होऊ शकते तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा ) हे सर्व व्हाट्सअप चॅट एका H अकाऊंट नावाच्या ग्रुपवर करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये 5 लोकांचा समावेश आहे. प्रदीप बक्षी, राज कुंद्रा, मेघा(viaan account) रोब डिजिटल मार्केटिंग हॉटशाटस आणि रॉय इव्ह्न्स कन्टेन्ट हेड हॉटशाटस अशी या सदस्यांची नावे आहेत. तसेच उमेश कामथ नावाच्या एका व्यक्तीचासुद्धा यामध्ये समावेश आहे. जी केनरीन या कंपनीची भारतातील प्रतिनिधी असून, ही कंपनी पोर्न फिल्मसाठी एजेंट आणि गुंतवणूक शोधायचे.
First published:

Tags: Shilpa shetty

पुढील बातम्या