'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा हा आठवडा ठरणार वादळी

शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर शंभूपर्व सुरू झालंय. त्यामुळे मालिकेत बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतायत. टीआरपी रेटिंगमध्येही ही मालिका हल्ली दोन आठवडे वरच्या स्थानावर आहे. आज ( 25 डिसेंबर ) मालिकेचे 400 भाग पूर्ण होतायत.

News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2018 06:58 AM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा हा आठवडा ठरणार वादळी

मुंबई, 25 डिसेंबर : शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर शंभूपर्व सुरू झालंय. त्यामुळे मालिकेत बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतायत. टीआरपी रेटिंगमध्येही ही मालिका हल्ली दोन आठवडे वरच्या स्थानावर आहे. आज ( 25 डिसेंबर ) मालिकेचे 400 भाग पूर्ण होतायत.

शंभूराजांनी हंबिररावांच्या मदतीनं अनाजी पंत, मोरोपंत, हिरोजी यांना अटक केली. त्यांची चौकशी करताना सोयराबाईंचं नाव समोर आलं. त्यामुळे शंभूराजांना धक्का बसला. स्वराज्याच्या न्यायासनासमोर नाती महत्त्वाची नसतात, असं त्यांनी ठणकावून तर सांगितलं. आता सोयराबाईंना शंभूराजे कधी भेटतील, काय शिक्षा करतील हे प्रश्न सगळ्यांना पडलेत.

येत्या आठवड्यात संभाजी महाराज कैद केलेल्या मंत्र्यांना घेऊन रायगडावर कूच करणार. रायगडावर ते जवळ जवळ अडीच-तीन वर्षांनी जातायत. तेव्हा शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर शंभूराजे रायगडावर जाताना त्यांच्या मनात काय कल्लोळ असेल, तेही मालिकेत पाहायला मिळणार आहे.

सोयराबाई आणि संभाजी महाराजांची बहीण यांच्यातला वादही रंगला. राणाक्का सोयराबाईंना दोन बोल सुनावले आहेत.

वास्तवापेक्षा दूर असलेल्या मालिकांत रमणारे प्रेक्षक 'स्वराज्यरक्षक संभाजी'सारख्या ऐतिहासिक मालिकेतही रमतातयत. म्हणून तर या मालिकेचा टीआरपीमधला नंबर 4 आहे. पहिल्या पाचात ही मालिका नेहमीच असते.

Loading...

'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये इतिहासाचं दर्शन होतंय. शिवाजी महाराजांच्या देहावसनानंतर रायगडावर अनाजी पंतांनी चुकीचा व्यवहार सुरू केला. सोयराबाईंचे कान भरून ते पन्हाळावर संभाजी महाराजांना अटक करायला निघाले. या अनाजी पंतांवर सध्या अनेक मिम्स बनल्या.अनाजींच्या कुकर्मात त्यांचा भाऊ सोमाजीचीही साथ आहे. त्यामुळे या मिम्समधून सोमाजीचीही सुटका नाही.

अनाजी पंतांची भूमिका अभिनेता महेश कोकाटे साकारतायत. त्यांची भूमिका इतकी चपखल आहे, की प्रेक्षकांचा राग त्यांना सहन करावा लागतोय. तो मिम्समधून बाहेर पडतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 06:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...