मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! 27 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला हा VIDEO; अभिनेत्रीने लावलं चाहत्यांना वेड

OMG! 27 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला हा VIDEO; अभिनेत्रीने लावलं चाहत्यांना वेड

हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : टीवीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस (Bigg Boss)’ मुळे सपना चौधरी (Sapna Choudhary) हिला देशभरात ओळख मिळाली आहे. हरियाणातील पॉप्युलर सिंगर व डान्सर सपना चौधरीच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. गावांगावांमध्ये सपनाचे चाहते तिच्या सादरीकरणाची प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे सपना हिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यादरम्यान एक स्टेज शोवरील जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ 2019 या वर्षातील आहे. ज्यात सपना चौधरी स्टेजवर धमाकेदार डान्स करीत असताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सपना चौधरी चुनरी जयपूर से मंगवाई या गाण्यावर डान्स करीत असताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ पसंतीस उतरला असून यूट्यूबवर आतापर्यंत हा व्हिडीओ 27 कोटी हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तुम्हीही पाहा सपना चौधरीचा व्हायरल व्हिडीओ...

" isDesktop="true" id="588547" >

‘बिग बॉस’ च्या 11व्या सीजनमध्ये सपना चौधरीला सामील झाली होती. या शोमुळे तिची अधिक चर्चा झाली होती. दुसरीकडे सपना चौधरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवरही सपना चौधरीचे अनेक हॉट फोटो व्हायरल होतात. ‘बिग बॉस’ मध्ये सामील होण्यापूर्वी सपना केवळ हरियाणवी गाण्यांमध्ये दिसत होती. मात्र या शोमुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे ती हरियाणीसह पंजाबी, भोजपुरी, बॉलिवूडमधील आयटम नंबरमध्येही दिसत आहे. तिने ‘दोस्ती के साइड इफेक्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Dancer, Viral video.