मुंबई, 17 मार्च- सुरुवातीला केवळ दक्षिणेतील राज्यांपुरती मर्यादित असणारी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री (south film industry) आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपट थेट ऑस्करसाठी नामांकित केले जाऊ लागले आहेत. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारदेखील तितकेच फेमस झाले असून या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग आहे. साऊथमधील अनेक कलाकार एका चित्रपटासाठी बॉलिवूड कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेतात. यामध्ये साऊथच्या अभिनेत्रीदेखील (south actresses) मागे नाहीत. तेवढंच नव्हे तर या अभिनेत्री दिसायलादेखील खूप सुंदर आहेत. आज आपण पाहणार आहोत, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अशा पाच अभिनेत्री, ज्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन घेतात.
नयनतारा - साऊथ अभिनेत्री नयनतारा सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
अनुष्का शेट्टी
या यादीतील सर्वात पहिलं नाव म्हणजे अनुष्का शेट्टी. अनुष्का शेट्टीने (Anushka Shetty) 2005 मध्ये ‘सुपर’ या तेलुगू चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये अनुष्का शेट्टीचे 4 चित्रपट आले आणि "विक्रमकुडू" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर अनुष्काने अरुंधती, सिंघम बिल्ला मिर्ची असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आतापर्यंत तिने 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2015 मध्ये "बाहुबली" चित्रपटानंतर, तिची लोकप्रियता जगभरात पसरली आणि त्यानंतर ती दक्षिण भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर आली. आता अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी 4 कोटी रुपये घेते. या संदर्भात राजस्थान पत्रिकाने वृत्त दिलंय.
सामंथा रुथ प्रभू
सामंथाने (Samantha ruth prabhu) 2010 मध्ये "ये माया चेसावा" या तेलुगू चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटानंतर तिला तमीळ आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीने सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार दिला होता. त्यानंतर समांथाने अत्तरिंटिकी दरेडी, सन ऑफ सत्यमूर्ती असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता समंथा एका चित्रपटासाठी 2 ते 2.5 कोटी रुपये मानधन घेते.
प्रियामणी
प्रियामणी (priyamani) ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती दक्षिण इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय आणि हिट चित्रपट दिले आहेत. प्रियामणीने आत्तापर्यंत तमीळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियामणी एका चित्रपटासाठी अडीच ते तीन कोटी रुपये फी घेते.
काजल अग्रवाल
काजल अग्रवाल (kajal Agrawal) दक्षिणेतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने साऊथप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अनेक हिट चित्रपट केले आहेत. काजलने जोसेफ विजय, रामचरण तेजा, प्रभास आणि अल्लू अर्जुन यांसारख्या टॉप दाक्षिणात्य कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत. साऊथच्या 'मगधीरा' चित्रपटातील तिचा अभिनय आजही लोकांना लक्षात आहे. काजल प्रत्येक चित्रपटासाठी 1 ते 1.5 कोटी रुपये मानधन घेते.
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia) 2005 मध्ये 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तमन्नाने 2007 साली ‘हॅपी डेज’ हा तेलुगू चित्रपट केला, जो सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तमन्ना भाटियाने स्केच, स्पीदुन्नोडू, बंगाल टायगर, बद्रीनाथ आणि बाहुबली यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. आता तमन्ना भाटिया प्रत्येक चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घेते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.