बॉलिवूडच्या मस्तानीनं नाकारलेले सलमानचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

दीपिकाच्या जवळपास 10 वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये तिनं अद्याप सलमान सोबत कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही.

  • Share this:

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका पदुकोणनं आतापर्यंत सर्व प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. मात्र सलमान खान याला अपवाद आहे. दीपिकाच्या जवळपास 10 वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये तिनं अद्याप सलमान सोबत कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही. सलमान सोबत काम करण्याची संधी दीपिकानं एक-दोन नाही तर तब्बल 5 वेळा घालवली. तिनं आतापर्यंत सलमानचे 5 सिनेमे नाकारले. पाहूया कोणते आहेत हे सिनेमे...

दिग्दर्शक अली अब्बस जफर यांचा 'सुलतान' हा सिनेमा सुरुवातीला दीपिकाला ऑफर करण्यात आला होता. पण शूटिंगच्या तारखांचा ताळमेळ बसत नसल्यानं दीपिकानं या सिनेमाला नकार दिला आणि त्यानंतर या सिनेमात दीपिकाच्या जागी अनुष्काला घेण्यात आलं.

'प्रेम रतन धन पायो' हा सलमानच्या ब्लॉकबास्टर सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. या सिनेमात सलमाननं सोनम कपूरसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. मात्र सोनमनं साकारलेल्या राजकुमारी मैथिलीच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. पण दीपिकानं यासाठी नकार दिला मात्र यामागचं कारण तिनं कधीच सांगितलं नाही.

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या 'किक' या सिनेमानं बॉक्स ऑफिवर चांगलाच गल्ला जमवला. यासिनेमातील आयटम साँगसाठी दीपिकाला विचारण्यात आलं होतं पण तिनं नकार दिल्यानंतर हे गाणं नर्गिस फखारीच्या पदरात पडलं.

सलमानचा आणखी एक ब्लॉकबास्टर सिनेमा 'बजरंगी भाईजान' दीपिकाला ऑफर करण्यात आला होता. मात्र हा सिनेमा सुद्धा तिनं नाकारला आणि त्यानंतर तिच्या जागी करिना कपूरला या सिनेमात कास्ट करण्यात आलं. यावेळी दीपिकानं डेट्स नसल्याचं कारण देत या सिनेमाला नकार दिला होता.

सलमानच्या 'जय हो' या सिनेमातून अभिनेत्री डेझी शहानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण तिच्या अगोदर या सिनेमासाठी दीपिकाची निवड करण्यात आली होती. पण तिनं या सिनेमाला नकार दिला आणि विशेष म्हणजे दीपिकानं नाकारलेले हे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या