Home /News /entertainment /

सुशांतच्या आत्महत्येनंतर वेगाने व्हायरल होतोय अक्षय कुमारचा हा जुना VIDEO

सुशांतच्या आत्महत्येनंतर वेगाने व्हायरल होतोय अक्षय कुमारचा हा जुना VIDEO

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने पुन्हा एकदा नैराश्य आणि बॉलिवूड याची चर्चा होऊ लागली आहे आणि अशातच अभिनेता अक्षय कुमार याचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

    मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड हादरून गेलं आहे. या प्रकरणावर बॉलिवूडमधून अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. अभिनेत्री कंगना रणौतने तर एक व्हिडिओ शेअर बॉलिवूडमधीलच काही लोकांना सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार धरलं आहे. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने पुन्हा एकदा नैराश्य आणि बॉलिवूड याची चर्चा होऊ लागली आहे आणि अशातच अभिनेता अक्षय कुमार याचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने नैराश्य या विषयावर एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओतून अक्षय म्हणतो, "तुम्ही तुमच्या आयुष्याला इतकं स्वस्त करू नका. तुम्हाला जन्म देणाऱ्या आईवडिलांचा विचार करा. आईवडिलांनाही मी सांगू इच्छितो की, कुठे गेला मुलांसोबतचा संवाद? मुलांना हात-पायाला जखम होते तेव्हा तुम्ही लगेच डॉक्टरला बोलावता. पण मानसिक आजार होतो तेव्हा तुम्ही काय करता? मानसिक आजारासाठीही उपचार घेणं खूप गरजेचं आहे." पुढे बोलताना अक्षय कुमारने एक आवाहनही केलं आहे. "तुम्हाला जेव्हा तणाव येतो तेव्हा कुणासोबत तरी तुमचं मन मोकळं करा. आज मला एक वचन द्या की टेन्शन कुठलंही असेल तर त्याच्यावर उपाय हा आहेच. मात्र आत्महत्या हा त्यावरील उपाय नाही." नैराश्यातून सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्येचं पाऊल उचलल्यानंतर अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच यूट्यूबवर हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 40 लाख लोकांनी पाहिला आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Akshay Kumar, Sushant sing rajput

    पुढील बातम्या