प्रार्थना सोशल मीडियावरही बरीच लोकप्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे सुरेख फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. इथं ती चाहत्यांना तिच्या भविष्यकाळातल्या प्रोजेक्ट्सविषयीही सांगत असते. गेले काही दिवस तिनं इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेलं फोटोशूट photo shoot हेसुद्धा चर्चेचा विषय ठरलं आहे. हे फोटोज नजर खिळवून ठेवणारे आहेत. प्रार्थना या फोटोजमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. चाहत्यांनी हे फोटोज सोशल मीडियावर येताक्षणीच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. हे फोटो लगोलग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे ही वाचा-मराठमोळी 'फॅशन' अभिनेत्री कशी पडली 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात? प्रार्थनाच्या हातात आता एक मोठा सिनेमा आहे. प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत असलेले इतर कलाकारही चांगले आहेत. रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यात तिच्यासोबत स्क्रीन शेअर करतील. या सिनेमातील काही दृश्यं लंडनमध्ये (London) शूट झाली आहेत. सोबतच प्रार्थना काही काळानं एका वेब सिरीजमध्येही दिसणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, London, Prarthana Behere