मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मेकओव्हर, नजर नाही हटणार, पाहा फोटो ओळखतेय का?

मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मेकओव्हर, नजर नाही हटणार, पाहा फोटो ओळखतेय का?

अनेकदा सेलिब्रिटीज मस्त मेकओव्हर करून चाहत्यांना धक्का देताना दिसतात. असाच एक सुखद धक्का एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं दिला आहे.

अनेकदा सेलिब्रिटीज मस्त मेकओव्हर करून चाहत्यांना धक्का देताना दिसतात. असाच एक सुखद धक्का एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं दिला आहे.

अनेकदा सेलिब्रिटीज मस्त मेकओव्हर करून चाहत्यांना धक्का देताना दिसतात. असाच एक सुखद धक्का एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं दिला आहे.

मुंबई, 21 जानेवारी : अनेकदा सेलिब्रिटीज आपला लूक सिनेमासाठी बदलतात. अनेकदा लहर आली म्हणून मेकओव्हरसुद्धा करतात. असाच एक अविश्वसनीय मेकओव्हर एका मराठमोळ्या (Marathi) अभिनेत्रीनं केला आहे.

ही अभिनेत्री (actress) आहे भार्गवी चिरमुले. भार्गवीनं आजवरच्या कारकिर्दीत बहुतांश भूमिका अगदीच साध्यासुध्या, नॉन-ग्लॅमरस पद्धतीच्या साकारल्या आहेत. आता मात्र तिनं केलेला मेकओव्हर (makeover) पाहून तिला ओळखणंही कठीण जातं आहे. या लूकमधले फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांना चाहत्यांच्या भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

तिनं ब्लॅक कलरचा स्लीव्हलेस टॉप घातला आहे. सोबत ब्लॅक कलरचा चष्मा आहे. तिच्या गेटअपला चष्मा एकदमच शोभून दिसतो आहे. तिच्या नव्या लुकवरून (stylish look) पाहणाऱ्याची नजर हटत नाही. या फोटोसोबत तिनं लिहिलं आहे, की 'मला नव्या गोष्टी ट्राय करण्याची सवयच आहे.' मराठी इंडस्ट्रीत (Marathi entertainment Industry) आपल्या ताकदीच्या भूमिकांच्या बळावर या अभिनेत्रीनं अनेकांची मनं जिंकली आहेत.

भार्गवीनं आजवर पिंजरा, अनुबंध, असंभव, वहिनीसाहेब अशा अनेक मराठी मालिकांमध्ये (Marathi serials) ठसा उमटवला आहे. सोबतच गोळा बेरीज, इष्कवाला, संदूक अशा अनेक मराठी सिनेमांमध्येही (Marathi cinema) तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. यासह तिनं स्वराज्यजननी जिजामाता, सिया के राम या मालिकांमध्ये केलेल्या भूमिका सामान्य रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

भार्गवी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. काही काळापूर्वीच तिनं साडीमध्ये केलेलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर (Instagram) टाकलं होतं. यात ती कमालीची ग्रेसफुल दिसत होती. हे तिचे फोटो चाहत्यांना अतिशय आवडले होते.

First published:
top videos

    Tags: Instagram, Marathi entertainment