गुड न्यूज! अनुष्का-विराटच्या घरी आली 'नन्ही मेहमान'

गुड न्यूज! अनुष्का-विराटच्या घरी आली 'नन्ही मेहमान'

अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या घरी आलेल्या छोट्या पाहुणीचा फोटो शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 25 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर आहे. सध्या ती पती विराट कोहलीसोबत वेस्ट इंडिजमध्ये एंजॉय करत आहे. पण बॉलिवूडपासून दूर झाल्यानं अनुष्काच्या प्रेग्नन्सीबाबत मागच्या काही दिवासांपासून उलट सुलट चर्चा सुरू आहेत. पण नुकतंच अनुष्का शर्मानं सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केली आहे. विराट अनुष्काच्या घरी एक छोटी पाहुणी आली असून तिचा फोटो अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या नव्या पाहुणीचं स्वागत अनुष्का आणि विराटनं अनोख्या पद्धतीनं करताना दिसले.

काही दिवसांपूर्वीच एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतानाचा विराट-अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय बीचवरील अनुष्काच्या बिकिनी लुकचीही खुप चर्चा झाली होती. त्यानंतर आता अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या घरी आलेल्या छोट्या पाहुणीचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक मांजर दिसत आहे. जी दूध पित आहे. अनुष्का शर्मानं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘आमची आजची डिनर गेस्ट’

स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलला या व्यक्तीनं बनवलं फेमस, कोण आहे ‘तो’

मागच्या बऱ्याच काळापासून अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं यावर संताप व्यक्त केला होता. एका मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला तिचं आयुष्य नसतं का? लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रेग्नन्सीबाबत प्रश्न का केले जातात. असा प्रश्न तिनं उपस्थित केला होता. शाहरुख खानसोबत ‘झीरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिनं कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. त्यामुळे तिच्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. सिनेमात काम करण्याविषयी अनुष्कानं कोणताही खुलासा केलेला नाही.

शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना, दिली 'ही' प्रतिक्रिया

===================================================================

VIDEO: पुण्यातील प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये अग्नितांडव!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 02:48 PM IST

ताज्या बातम्या