'बाहुबली'चा प्रश्नावर सलमान म्हणतो, 'बाहुबली' के पहले भी हम थे, बाहुबली के बाद भी हम है'

'बाहुबली'चा प्रश्नावर सलमान म्हणतो, 'बाहुबली' के पहले भी हम थे, बाहुबली के बाद भी हम है'

त्याबरोबरच सलमान म्हणाला की, अजुनही मी 'बाहुबली 2' पाहिलेला नाहीये, परंतु तो एक अद्भुत सिनेमा आहे.

  • Share this:

 21 मे : 'ट्युबलाइट' या सलमान खानच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. यावेळी 'ट्युबलाइट' हा सिनेमा 'बाहुबली 2' ला कमाईत मागे टाकेल का ? असं सलमानला विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला की, 'बाहुबली-1 च्या नंतरही मी आलो 'बजरंगी भाईजान' मधून तर 'बाहुबली 2' नंतरही मी येतोय 'ट्युबलाइट' मधून.

त्याबरोबरच सलमान पुढे बोलताना म्हणाला की, अजुनही मी 'बाहुबली 2' पाहिलेला नाहीये, परंतु तो एक अद्भुत सिनेमा आहे.

'बाहुबली-२ च्या जबरदस्त यशानंतर दबाव जाणवतोय का ?' या प्रश्नावर उत्तर देताना सलमान म्हणाला, त्याचा माझ्यावर जास्त दबाव नाही, परंतु निर्मात्यांना तो दबाव जाणवतोय. प्रत्येक सिनेमाचं एक नशीब असतं, तसेच नशीब आमच्या सिनेमाचंही आहे',असंही सलमान यावेळी म्हणाला.

'बाहुबली'ला मिळालेलं यश मोठे असलं तरीही 'बाहुबली'च्या दोन्ही व्हर्जनच्या ४ वर्षांमध्ये सलमानचे तीन सिनेमे हीट झाले, ज्यांचे बॉक्सऑफिस कलेक्शन 'बाहुबली'च्या १५०० कोटींपेक्षा जास्त आहे.

असो, सलमानचा 'ट्युबलाइट' हा सिनेमा २५ जूनला रिलीज होतोय, ज्यामध्ये त्याच्या जोडीला भाऊ सोहेल खानही पहायला मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2017 07:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading