09 नोव्हेंबर : "तू परशाला हात तर लावून बघ, नाय थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाय..." या धडाकेबाज डायलाॅगने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली. पण, हल्ली आर्चीच्या नावाने काहीही सोशल मीडियावर विकलं जातंय. असाच एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झालाय. पण ती पडलेली 'आर्ची' आपली नाहीच हे स्पष्ट झालंय.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. याचा फटका आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला बसलाय.
एका नदीकाठी आर्ची सारखीच दिसणारी 'आर्ची' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान नाचताना पडली. मग काय हा व्हिडिओ व्हाॅटसअॅप, फेसबुक, युट्यूबवर व्हायरल झाला. बरं एवढंच नाहीतर हा कन्नड मधल्या सैराटचा रिमेक 'मनसू मल्लिगे'तला व्हिडिओ आहे असा दावाही करण्यात आलाय.
पण, याबद्दल रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली. नदीकाठी शुटिंग दरम्यान पडलेली आर्ची आमची नाही असा स्पष्ट खुलासा महादेव राजगुरू यांनी केला. तसंच या व्हिडिओतील आर्चीचा आणि रिंकूचा कोणताही संबंधही नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मग हा व्हिडिओ कुणाचा ?
तर हा व्हिडिओ आहे लिंडा कुमार या दाक्षिणात्य अभिनेत्रीचा आहे. मल्याळम दिग्दर्शक सिद्दीक चेंडमंगलू यांच्या आगामी चित्रपटातला हा व्हिडिओ आहे. या चित्रपटाचे नाव कुंजीरामंट्ये कुप्पायम असं आहे. कोझीकोड मधील पेरांबराजवळच्या जानकी जंगलात या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं तेव्हा लिंडा पाय घसरून पडली होती. या अपघातानंतर 10 दिवस शुटिंग थांबलं होतं. नंतर पुन्हा सुरू झालंय.
एकंदरीतच काय तर सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकतं. पण, खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्याचं तुमच्या एका क्लिकवर अवलंबून आहे. जेणे करून असं काही व्हायरल तर होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Archi, Rinku rajguru, Rinku video, Sairat