मुंबई, 27 मार्च- बॉलिवूडमध्ये
(Bollywood) कलाकार जितके चर्चेत असतात,तितकेच त्यांची आपत्येसुद्धा चर्चेत असतात. न्यासा देवगन
(Nysa Devgan) ही अशाच प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी
(Starkids) एक आहे. न्यासा ही बॉलिवूडमधील सिंघम अर्थातच अजय देवगन
(Ajay Devgan) आणि काजोल
(Kajol) यांची लेक आहे. ती अभिनयसृष्टीत येण्यापूर्वीच आपल्या आईवडीलांप्रमाणे लोकप्रिय झाली आहे. न्यासा देवगन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या स्टायलिश लुकने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
न्यासा देवगन नुकतंच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी
(Manish Malhotra) मॉडेल बनली होती. मनीष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर न्यासाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती त्यांच्या डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
नुकतंच लॅक्मे फॅशन वीक
(Lakme Fashion Week) पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांनी आणि स्टार किड्सनी सहभाग घेतला होता. यावेळी न्यासा मनीष मल्होत्राच्या ब्रँडसाठी मॉडेल म्हणून रॅम्पवर उतरली होती. जिथे डिझायनरने त्याचे डिफ्यूज कलेक्शन प्रदर्शित केले. यादरम्यान, न्यासाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला मल्टी-कलर क्रॉप टॉप आणि थाई-हाय स्लिट स्कर्ट घातला होता. ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. यासोबतच न्यासाने मल्टीकलर ब्लेझरदेखील घातला होता.

मनीष मल्होत्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिलंय, 'मनीष मल्होत्राच्या न्यू-एज ऑर्डर डिफ्यूज ट्राइबमध्ये न्यासा देवगन.' न्यासाचा हा लुक पाहिल्यानंतर चाहत्यांना तिची आई आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आठवण येत आहे. कमेंट करताना, अनेक युजर्सनी न्यासा ही काजोलची कॉपी असल्याचं म्हटलं आहे आणि या स्टारकिडचे प्रचंड कौतुकही केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.