सैफची मुलगी सारा पीसीओडीने ग्रस्त, काय आहे हा आजार?

तरुणींमध्ये सर्वाधिक प्रमाण हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पीसीओडीची समस्या जाणवते.

News18 Lokmat | Updated On: Nov 23, 2018 06:55 PM IST

सैफची मुलगी सारा पीसीओडीने ग्रस्त, काय आहे हा आजार?

 


मनाली पवार, प्रतिनिधी


23 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान-अमृता सिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. लवकरच 'केदारनाथ' या सिनेमातून ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वी सारा एका शोमध्ये दिसली होती, तेव्हा तीने पीसीओडी नावाच्या आजाराने ती ग्रस्त असल्याचं म्हटलं होतं. तर महिलांना होणारा पीसीओडी हा आजार म्हणजे नेमका काय ?

Loading...


कॉफी विथ करण या शोमध्ये सैफ आणि सारानं नुकतीच हजेरी लावली. दरम्यान तिनं आपल्याबद्दल काही गोष्टी शेअरही केल्या. कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना साराचं वजन तब्बल 96 किलो इतकं होतं. चित्रपटात एन्ट्री करण्यासाठी तिला वजन कमी करणं अत्यंत गरजेचं होतं. पण ती पीसीओडी नावाच्या आजारानं ग्रस्त असल्यानं वजन कमी करणं सोप्प नव्हतं, असं सारा म्हणाली.


पीसीओडी म्हणजे 'पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज'. हा आजार आजच्या तरुणींमध्ये सर्वाधिक आढळतो. मागील काही वर्षांमध्ये मुलींमध्ये पीसीओडीची समस्या वाढली असून हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही समस्या उद्भवत असल्याचं दिसून येतं. या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो. साधारणपणे 15 ते 45 वर्षं या वयोगटातील 10 ते 20 टक्के प्रमाणात पीसीओडी दिसून येतो.


पीसीओडी म्हणजे 'पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज'

तरुणींमध्ये सर्वाधिक प्रमाण हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पीसीओडीची समस्या जाणवते. या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात. 15 ते 45 वर्षं वयोगटातील महिलांमध्ये 10 ते 20 टक्के प्रमाणात पीसीओडीची समस्या आढळते.


प्रामुख्यानं पीसीओडीत आढळणारी लक्षणं सर्वाधिक मासिक पाळीशी निगडीत असतात. त्यात मासिक पाळीतील अनियमितता हे प्रमुख लक्षण आहे. पाळीदरम्यानचा स्त्राव कमी होवू लागतो आणि कालांतराने पाळी येणचं बंद होतं. अनियमित मासिक पाळीचा परिणाम म्हणजे येणारे वंध्यत्व. वजन अधिक वाढतं. चेहऱ्यावर लव दिसू लागते, हातापायांवर, पोटावरही लव वाढते. चेहऱ्यावर मुरुमं येतात. मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसते. केस गळण्याचं प्रमाणही वाढतं.

परिणामी महिलांची मानसिकता ढासळते. काही डॉक्टरांच्या मते पीसीओडीचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. परंतु काही उपचार, योगासनं आणि आहार सवयी बदलल्यास हा आजार नक्की कमी होऊ शकतो.


पीसीओडी म्हणजे काय?


पीसीओडी म्हणजे 'पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज'

तरुणींमध्ये सर्वाधिक प्रमाण

हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पीसीओडीची समस्या

या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात

15 ते 45 वर्षं वयोगटातील महिलांमध्ये 10 ते 20 टक्के

प्रमाणात पीसीओडीची समस्या


पीसीओडीची लक्षणं


पीसीओडीत आढळणारी लक्षणं सर्वाधिक मासिक पाळीशी निगडीत

मासिक पाळीतील अनियमितता प्रमुख लक्षण

पाळीदरम्यानचा स्त्राव कमी होऊन कालांतराने पाळी बंद होणे

अनियमित मासिक पाळीचा परिणाम म्हणजे येणारे वंध्यत्व

यात वजन अधिक वाढतं

चेहरा, हातापायांवर आणि पोटावर लव येणे

चेहऱ्यावर मुरुमं येणे

मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसणे

केस गळण्याचं प्रमाण वाढतं

काही महिलांची मानसिकता ढासळते


===================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...