Home /News /entertainment /

VIDEO: जलपरी बनून अशी झाली नोरा फतेहीची अवस्था; स्ट्रेचरवर पोहोचली अभिनेत्री

VIDEO: जलपरी बनून अशी झाली नोरा फतेहीची अवस्था; स्ट्रेचरवर पोहोचली अभिनेत्री

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या बोल्ड फोटो आणि किलर डान्स मूव्ह्समुळे नेहमीच चर्चेत असते.

    मुंबई,18  डिसेंबर-  बॉलिवूड  (Bollywood)  अभिनेत्री नोरा फतेही   (Nora Fatehi)  तिच्या बोल्ड फोटो आणि किलर डान्स मूव्ह्समुळे नेहमीच चर्चेत असते. डान्सिंग क्वीन नोरा फतेही यावेळी सुपरस्टार गायक गुरू रंधावासोबत  (Guru Randhawa)  धमाका करणार आहे. नोरा तिच्या गाण्यात 'जलपरी'च्या अवतारात दिसणार आहे. 'डान्स मेरी रानी'  (Dance Meri Rani)  हे नवं म्युझिक अल्बम लवकरच रिलीज होणार आहेत. मात्र, अभिनेत्रीची अवस्था इतकी बिकट झाली आहे की तिला सेटवरून आणण्यासाठी स्ट्रेचरची मदत घ्यावी लागली.मात्र अभिनेत्रीला स्ट्रेचरवर पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत, चाहते कमेंट करून सर्वकाही ठीक आहे ना? अशी विचारणा करत आहेत. नोरा फतेही दुसऱ्यांदा पंजाबी गायक गुरु रंधावासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'डान्स मेरी रानी' हा नवीन म्युझिक अल्बम 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. परंतु हे गाणं रिलीज होण्याआधीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना नोराच्या तब्येतीची चिंता वाटू लागली आहे. तसं पाहिलं असता, व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्ट्रेचरवर झोपलेली दिसत आहे . म्युझिक अल्बमसाठी नोरानं 'जलपरी'चा अवतार घेतला असून अभिनेत्रीला घट्ट कपड्यांमध्ये फिरणं कठीण होत आहे. याच कारणामुळे नोराला स्ट्रेचरवर झोपवून सीनच्या ठिकाणी हलवलं जात आहे. नोरा फतेहीच्या या ड्रेसबद्दल बोलायचं झालं तर, हा काही सामान्य ड्रेस नाही. नोराचा हा ड्रेस परदेशात तयार करण्यात आला आहे.ज्याचं वजन 15 किलो आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याला बनवण्यासाठी सुमारे 3 महिने लागले आहेत, जे परिधान करणं आणि त्यात हालचाल करणं खूप कठीण काम आहे. 'डान्स मेरी रानी' हे गाणं गुरू रंधावा आणि जहेरा एस खान यांनी गायलं आहे. हे गाणं रश्मी विराग यांनी लिहिलं असून तनिष्क बागची यांनी त्याला संगीत दिलं आहे. व्हिडिओ बॉस्को लेस्ली मार्टिस यांनी क्युरेट, डिझाइन आणि दिग्दर्शित केला आहे
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Nora fatehi

    पुढील बातम्या