मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Love Story : डॅनिअल असा पडला अडल्ट सिनेमात करणाऱ्या सनी लिओनीच्या प्रेमात!

Love Story : डॅनिअल असा पडला अडल्ट सिनेमात करणाऱ्या सनी लिओनीच्या प्रेमात!

यावेळी डॅनिअलनं सांगितलं की, आम्ही रस्त्यातच पॉलीला भेटलो आणि तो त्यांच्या एका मित्राला भेटायला निघून गेला आणि अशाप्रकारे देवानं माझी आणि सनीची भेट घडवून आणली. हे माझं भाग्य होतं.

यावेळी डॅनिअलनं सांगितलं की, आम्ही रस्त्यातच पॉलीला भेटलो आणि तो त्यांच्या एका मित्राला भेटायला निघून गेला आणि अशाप्रकारे देवानं माझी आणि सनीची भेट घडवून आणली. हे माझं भाग्य होतं.

सनीचं लव्ह लाइफ कुठल्याही प्रेम कहाणीपेक्षा कमी नाही.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 10 फेब्रुवारी : सनी लिओनीला आता लोक तिच्या पॉर्न चित्रपटांमुळे नाही तर अभिनय, डान्स आणि सामाजिक कामामुळे ओळखतात. एवढंच नाही तर ती आता पॉर्नस्टारवरून एक फेमस सेलेब्रिटी बनली आहे. त्यामुळे सध्या तिचे चाहत्यांना तिची लव्ह लाइफ बद्दल जाणून घेण्यात जास्त रस आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सनीने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितलं आहे.

सनीचं लव्ह लाइफ कुठल्याही प्रेम कहाणीपेक्षा कमी नाही. याबद्दल सनी म्हणते वेगसमध्ये डॅनियल आणि तिच्या एका जवळच्या मित्रामुळे ते दोघे डॅनियलच्या बर्थडे पार्टीत पहिलांदा भेटले. डॅनियलचं असं म्हणणं आहे तो सनीला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता पण तिच्या मनात तसं काहीच नव्हतं.

सारा अली खान ते शाहिद कपूर, 'या' स्टारकिड भावंडांच्या वयात आहे मोठं अंतर

सनीला पार्टीत पाहिल्यानंतर कुठूनतरी डॅनियलला तिचा नंबर आणि ईमेल आयडी मिळाला. त्याने सनीला फोन करण्याएवजी ईमेल केला आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं. त्याच दरम्यान ती न्यूयॉर्कला जात होती जिथे डॅनियल राहात होता. जेव्हा सनी डॅनियलला पहिल्यांदा भेटायला गेली तेव्हा ती उशिरा पोहोचली. त्यांच्या पहिल्या डेटवर त्याने खास वागणूक दिली. त्यावेळी त्यांनी ३ तास एकत्र वेळ घालवला. आमच्याकडे पाहून असं वाटतच नव्हतं की ही आमची पहिली भेट आहे, सनी सांगते.

प्रियांका चोप्रा इव्हेंटसाठी वापरते एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून व्हाल थक्क

सनीने कुणासोबतही अडल्ट चित्रपटांमध्ये काम केलेलं डॅनिअलला आवडत नव्हतं. त्यामुळे त्याने स्वतःच तिच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली. नंतर त्या दोघांनी एक कंपनी सुरू केली. कालांतराने तिच्या आईचे निधन झाले. तेव्हा डॅनियल तिच्या सोबत ठाम उभा राहिला. त्यानंतर आजपर्यंत त्याने तिची प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे. त्यामुळे तिला तिचं आयुष्य कुठल्याही प्रेम कहाणीपेक्षा कमी वाटत नाही.

‘आतापर्यंत एकाही मुलानं मला...’ दिशा पाटनीनं व्यक्त केली तिच्या आयुष्यातली खंत

First published:

Tags: Bollywood, Sunny Leone