मुंबई, 20 मार्च- सोशल मीडियावर सतत बॉलिवूड सेलब्सचे बालपणाचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या देखील सोशल मीडियावर क्लासिकल डान्स करत असलेल्या एका चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली 1960 ते 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री (Bollywood Celebs Childhood Photo) आहे. त्याकाळात त्यांनी सिनेमा जगतावर राज्य केलं. त्यांच्या डान्सनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यांना बॉलिवूडमध्ये जुबली गर्ल या नावनं ओळखलं जातं. लाखो मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा चाहता वर्ग मोठा होता, मात्र असं जरी असलं तरी त्यांनी लग्न केलं नाही. आज देखील त्या एकटं आयुष्य जगच आहेत.
तुम्ही जर या अभिनेत्रीला अद्याप देखील ओळखलं नसेल तर त्यांच्याबद्दल काही हिंट देतो. या चिमुकलीनं त्याकाळात राजेश खन्ना, धर्मेंद्र, शम्मी कपूरसहीत अनेक टॉपच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. त्यांनी 10 वर्षाच्या वयाचच काम करण्यास सुरूवात केली. ब्लॅक अॅण्ड व्हाईट ड्रेसमध्ये क्लासिकल डान्स करणारी ही चिमुकली कोण आहे ..असा प्रश्न पडणं साहजिकचं आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कोण नाही तर लोकप्रिय अभिनेत्री आशा पारेख या आहेत.
वाचा-'सलग तीन वर्ष... ' पुरस्कार मिळताच अरुंधती फेम मधुराणी अशी झाली व्यक्त
आशा पारेख यांनी त्याकाळात त्यांच्या अभिनय शैलीनं प्रेक्षकांचे मन जिंकलं होतं. त्यांच्या डान्स कौशल्यामुळं त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या काळात त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमात काम केलं. त्यामुळचं त्यांना हिट गर्ल नावानं ओळखलं जात होतं. आशा पारेख यांना राजेंद्र कुमार लकी मानत होते. यामुळेच ते आशा पारेख यांना भाग्यलक्ष्मी नावानं हाक मारत असे. आशा पारेख आणि सिनेमा हिट होणं हे त्याकाळतलं समीकरणच बनलं होतं.
आशा पारेख यांच्या काही सिनेमानं बॉक्स ऑफीसवर सिल्वर जुबली गेली. त्यामुळं त्यांना ‘जुबली गर्ल’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. काही वर्षातच त्यांनी बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर आशा पारेख या काही काळ सिनेमा जगतापासून लांब राहिल्या.
त्यानंतर त्यांनी 16 व्या वर्षी सिनेमा जगतात परत आल्या. बॉलिवूडमध्ये त्यांनी एकापेक्षा एक यशस्वी सिनेमे दिले आहेत. यासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन आशा पारेख यांचा गौरव करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment