Home /News /entertainment /

सोशल मीडियावर VIRAL होतोय या चिमुकलीचा फोटो; पाहा कोण आहे ही अभिनेत्री

सोशल मीडियावर VIRAL होतोय या चिमुकलीचा फोटो; पाहा कोण आहे ही अभिनेत्री

नुकताच सोशल मीडियावर एका गोंडस मुलीचा फोटो व्हायरल होतं आहे. ती अभ्यास करायला लागल्यामुळे रडताना दिसत आहे.

  मुंबई, 5 जुलै-  बालपणात (Childhood) अनेक मुला-मुलींना अभ्यासाचा कंटाळा असतो. अभ्यास म्हटलं की अनेकांचं रडवं तोंड पाहायला मिळत. याला काही कलाकारसुद्धा अपवाद नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका बॉलिवूड अभिनेत्रीचा (Bollywood Actress) असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) होतं आहे. सध्या एका मोठ्या कारणाने ही अभिनेत्री चर्चेतसुद्धा आहे. नुकताच ही अभिनेत्री ट्वीटरवर सुद्धा ट्रेंड झाली होती. एव्हाना ही अभिनेत्री कोण आहे याची तुम्हाला कल्पना आलीचं असेल.
  नुकताच सोशल मीडियावर एका गोंडस मुलीचा फोटो व्हायरल होतं आहे. ती अभ्यास करायला लागल्यामुळे रडताना दिसत आहे. तर तिच्या जवळच तिची आईसुद्धा बसली आहे. हा फोटो दुसऱ्या कोणाचा नसून बॉलिवूडची दंगल गर्ल फातिमा सना शेखचा आहे. फातिमा बालपणात खुपचं गोंडस दिसत होती. फातिमाला अभ्यासाचा खुपचं कंटाळा असल्याचंसुद्धा तिनं सांगितलं होतं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
  फातिमाने एक बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने अभिनेता कमल हसन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या प्रसिद्ध ‘चाची 420’ या चित्रपटात त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. तसेच तिने आणखी काही चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून ओळख आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटामुळे मिळाली आहे. या चित्रपटानंतर आमिर खान आणि फातिमाच्या अफेयर्सच्या चर्चांना उधान आलं होतं. (हे वाचा: सोनाली-फुलवाच्या मैत्रीची दशकपूर्ती; शेयर केला खास VIDEO) नुकताच आमिर खान आणि किरण रावने घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर फातिमा मोठ्या चर्चेत आली होती. इतकच नव्हे तर ती ट्वीटरवर ट्रेंड करू लागली होती. अनेकांनी तिला ट्रोल करत दोषी ठरवलं होतं. तर काहींनी आमिरची तिसरी पत्नी म्हणूनही खिल्ली उडवली होती. मात्र फातिमाने एकदा दिलेल्या मुलाखतीमध्ये या आमिर आणि तिच्या अफेयरच्या चर्चेत कोणतच तथ्य नसल्याचं सांगितल होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या