मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फोटोतील चिमुकलीनं 90 च्या दशकात घातला होता धुमाकूळ, 17 व्या वर्षीच झाली होती 'मिस इंडिया'

फोटोतील चिमुकलीनं 90 च्या दशकात घातला होता धुमाकूळ, 17 व्या वर्षीच झाली होती 'मिस इंडिया'


फोटोतील चिमुकलीनं 90 च्या दशकात घातला होता धुमाकूळ

फोटोतील चिमुकलीनं 90 च्या दशकात घातला होता धुमाकूळ

फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला आपण ओळखलंत का? ही चिमुकली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहे. 80-90 च्या दशकात आपलं सौंदर्य आणि अभिनय याच्या बळावर तिनं चाहत्यांना भूरळ घातली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल-  फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला आपण ओळखलंत का? ही चिमुकली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहे. 80-90 च्या दशकात आपलं सौंदर्य आणि अभिनय याच्या बळावर तिनं चाहत्यांना भूरळ घातली होती. अभिनयासोबतच डान्समध्येही त्या काळात हिचा कुणी हात धरू शकत नव्हतं. तिनं भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक आणि ओडिसी यासारख्या डान्स प्रकारात विशेष नैपुण्य प्राप्त केलं. तर अवघ्या 17 व्या वर्षी फोटोतील चिमुकलीनं 'मिस इंडिया'चा किताब पटकावला होता. तिने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक अव्वल चित्रपट दिले होते. या वर्णनावरून नक्कीच आपण या चिमुकलीला ओळखलं असेल.

गेल्या काही काळापासून बॉलीवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आता या लिस्टमध्ये 90 च्या दशकात फेमस असणाऱ्या अभिनेत्रीचा फोटोही व्हायरल झाला आहे. फोटो पाहून तिला ओळखणं तसं अवघडंच आहे. परंतु, तिनं सनी देओलच्या सोबत एका धमाकेदार चित्रपटात काम केलं होतं. या दोघांची जोडीही खूप हिट झाली होती. या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. लग्नानंतर बॉलीवूडसोबतच भारतही सोडून ती अमेरिकेत सेटल झाली. अजूनही आपण या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर चला आम्हीच आपल्याला या दिग्गज अभिनेत्रीचं नाव सांगतो.

वाचा-मुकेश अंबानींची सुनबाई दुसऱ्यांदा होणार आई, श्लोकाच्या बेबी बंपनं वेधलं लक्ष

चिमुकली उत्तम अभिनेत्रीसोबतच उत्कृष्ट डान्सर

80-90 च्या दशकात 'हिरो', 'दिलवाला', 'दामिनी' आणि 'घातक' सारख्या सुपरहिट चित्रपटात दिसलेली ही अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आहे. मीनाक्षीनं आपल्या फिल्मी करियरची सुरुवात पेंटर बाबू या चित्रपटापासून केली. ती सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. अभिनयासोबतच तिनं भरतनाट्यम, कुचीपुडी, कथ्थक आणि ओडिसी सारख्या नृत्य प्रकारातही विशेष नैपुण्य संपादन केले आहे. मीनाक्षीनं आपल्या अभिनय कारकीर्दीत अनेक चांगले चित्रपट केले. तरीही तिला खरी ओळख मिळाली ती अभिनेता जॅकी श्रॉफ सोबत केलेल्या 'हिरो' चित्रपटातूनच मिळाली. या चित्रपटानंतरच ती रातोरात स्टार झाली होती.

वाचा-'हा' स्पर्धक बनला 'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता; बक्षीसात मिळालं काय-काय?

सिनेकारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम

मीनाक्षी शेषाद्रीने आपल्या करियरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केलं. तसेच अनेक स्टारसोबत तिनं स्क्रीन शेअर केली. राजकुमार संतोषी यांच्या मनात मीनाक्षी बद्दल सॉफ्ट कॉर्नर होता असं सांगतिलं जातं. ते तिला पसंतही करत होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक चित्रपटात पहिली पसंती मीनाक्षीलाच होती. तिच्याशी लग्न करण्याचीही त्यांची इच्छा होती. परंतु, करियर टॉपला असतानाच मीनाक्षीनं हरीश मैसूर या बँकर सोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्राला बाय बाय करत तिनं भारतही सोडला आणि अमेरिकेत सेटल झाली.

मीनाक्षी 'मेरी जंग', 'शहेनशाह', 'घायल', 'दामिनी' आणि 'घातक' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखली जाते. आपल्या कारकिर्दीत तिनं अनेक चमकदार व्यक्तिरेखा साकारल्या. चाहत्यांच्या मनात तिनं केलेल्या भूमिका आजही कायम आहेत. आपल्या कारकिर्दीत सनी देओल, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ अशा बड्या कलाकारांसोबत तिनं काम केलं.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment