मोठी बातमी! सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून ही मोठी माहिती गायब; वकिलांनी केला सवाल

मोठी बातमी! सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून ही मोठी माहिती गायब; वकिलांनी केला सवाल

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात वकील विकास सिंह (Lawyer Vikas Singh) सातत्याने रिया चक्रवर्ती आणि महाराष्ट्र पोलिसांवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. आता विकास सिंह यांनी सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवर (Post mortem Report) सवाल उपस्थित केला आहे. न्यूज एजंसी ANI शी बातचीत करताना सुशांतच्या वडिलांना विकासला सांगितले, सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याला मारल्यानंतर फाशी देण्यात आली होती की त्याचा मृत्यू फाशीमुळे झाला होता? त्यांनी सांगितले की या सर्व गोष्टी मृत्यूची वेळ माहिती असल्यावरचं स्पष्ट होऊ शकतील.

यापूर्वी सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, माझ्या तक्रारीत हे स्पष्ट करण्यात आले आहे की मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गोंधळ केला आहे. ते योग्य पद्धतीने तपास करीत नाहीत. मला बिहारमध्ये FIR दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझी मुलगी अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर होती जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि सुशांतची बॉडी खाली उतरवली. त्यांनी दरवाजा उघडण्यापूर्वी टाळं तोडणाऱ्याला कोठून पाठवलं. या सर्व गोष्टी संशयास्पद नाहीत का? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूची वेळ देण्यात आलेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

फॉरेंसिक रिपोर्टमध्ये झाले मोठे खुलासे

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात कलिना फॉरेंसिक लॅबमधून टॉक्सिकोलॉजी, साइबर, लिजीचार मार्क, नेल सैंपलिंग, स्टमक वॉश रिपोर्ट आली आहे. रिपोर्टनुसार सुशांतच्या शरीरावर कोणत्याही खूणा नाहीत, ज्यावरुन त्यांची हत्या झाल्याचे समोर येईल. त्याच्या कपड्यांवर पांढरे डाग होते. नेल सॅम्पलिंग रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारे झटापटीचे निशाण नाही. त्याच्या कपड्यांवरील पांढरे डाग त्यांच्या लाळेचे होते जे आत्महत्येनंतर त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि कपड्यांवर सुकले गेले. रिपोर्टनुसार हे कोणत्याही हल्ल्याचे निशाण नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 6:26 PM IST

ताज्या बातम्या