धोनीसोबत असलेल्या नात्यामुळे ती फारच चर्चेत आली होती. पण नंतर काही कारणांनी दोघांनीही एकमेकांची साथ सोडली. लक्ष्मीने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, “मी तेव्हा टीम चेन्नई सुपरकिंग्सची ब्रँड अम्बॅसेडर होते. तो टीमचा एक भाग होता त्यामुळे जवळपास वर्षभरापेक्षाही कमी काळ आम्ही एकत्र होतो. आम्ही कधीच एकमेकांना लग्नाचं कमिटमेंट केलं नाही किंवा लग्नाविषयी विचार देखील केला नाही. त्यामुळे मला समजत नाही अजूनही लोक आमच्याविषयी का बोलतात?”View this post on Instagram
काहे दिया 'कमेंट', सायलीच्या फोटोवर ऋतुराज घायाळ, चर्चा तर होणारच!
2016 साली धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ (MS Dhoni: The Untold story) हा चित्रपट आला होता. तेव्हाही लक्ष्मी फारच नर्व्हस झाली होती. आपलंही पात्र दाखवलं जाईल का अशी भीती तिला वाटत होती. पण चित्रपटातून हा भाग वगळण्यात आला. आणि त्यामुळे जास्त लोकांना या अफेअरविषयी समजलं नाही. राय लक्ष्मी ही साउथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक साउथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती सिंड्रेला, झांसी आयपीएस, अनंधा भैरवी, गँगस्टर 21 आणि ओट्टाकोम्बन या चित्रपटांत दिसणार आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Entertainment, Love, MS Dhoni, Relationship, Sports