Home /News /entertainment /

'किती सुंदर दिसता! हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं पण खरं सांगू ....' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'किती सुंदर दिसता! हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं पण खरं सांगू ....' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बाबी आत्या हे पात्र अभिनेत्री सारिका नवाथे ( sarika nawathe ) साकारताना दिसत आहे. सारिका नवाथे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 18 मे - स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिका कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. सर्वांना अप्पू आणि शशांकची केमेस्ट्री देखील प्रचंड आवडत आहे. नुकतंच या मालिकेत बाबी आत्याच्या लग्नसोहळा पार पडल्याचे पाहायला मिळाला. या मालिकेत बाबी आत्या हे पात्र अभिनेत्री सारिका नवाथे ( sarika nawathe ) साकारताना दिसत आहे. सारिका नवाथे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतीच तिनं एक पोस्ट केली आहे, ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. सारिकानं ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या सेटवरील तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं लाल रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. नव्या नवरीच्या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिनं तिचे सुंदर फोटो शेअर करत म्हटलं आहे की, किती सुंदर दिसता !!! हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं ,.. पण खरं सांगू यामागे खूप लोकांची मेहनत असते ..हेअर, मेकअप, कॉस्ट्यूम अनेक मंडळी काम करत असतात .. कॉम्पलीमेंट्स मात्र आम्हाला मिळतात !! तुमच्या प्रत्येक like आणि compliment चा मोठा वाटा त्यांचा 🙏… आणि हो अजून एक thank you आमच्या कोअॅक्टर्सना जे उत्साहानी फोटो काढून देतात 😊...अशी पोस्ट सारिकांनी केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुक होत आहे. वाचा-'The Archies' साठी जबरदस्त मेहनत घेतेय शाहरुखची लेक, सुहानाचा Unseen फोटो VIRAL खऱ्या अर्थाने आपण पडद्यावर एक चेहऱा पाहतो मात्र तो चेहरा सुंदर बनवण्यासाठी, त्या भूमिकेत बसण्यासाठी संपूर्ण टीम काम करत असते. यातूनच एक कलाकृती समोर येत असते. कलाकाराला याचा गोष्टी मोठ्या बनवत असतात, हेही तितकच खरं आहे. वाचा-Cannes 2022: परिकथेची परी! उर्वशी रौतेलाच्या रेड कार्पेट LOOK ची चाहत्यांना भुरळ हर्षवर्धन नवाथे हे मराठी अभिनेत्री सारिका नवाथेचे (Sarika Nawathe) पती आहेत. हर्षवर्धन नवाथे यांनी 2000 साली केबीसीमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी ते एक कोटी रुपये जिंकले होते. मुंबईचे असलेले त्या वेळी हर्षवर्धन नवाथे 27 वर्षांचे होते आणि आयएएस ऑफिसर (IAS officer) होण्याचं स्वप्न पाहत होते. याचदरम्यान, त्यांनी केबीसीमध्ये भाग घेतला. केबीसी जिंकल्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच 2007 साली अभिनेत्री सारिकासोबत त्यांचे लग्न झाले. सारिका आणि हर्षवर्धन याचं अरेंज मॅरेज झालं. त्या दोघांना दोन मुलं आहेत. हर्षवर्धन यांच्या आई-वडिलांनी सारिकाला पसंत केलं आणि या दोघांचं लग्न झालं. हर्षवर्धन नवाथे सध्या डच रिक्रूटमेंट कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
  सारिकानं 'पहिली शेर दुसरी सव्वा शेर' चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम केलं आहे. तसेच दूरदर्शनवरच्या 'गुलाम ए मुस्तफा' या हिंदी मालिकेत देखील सारिकाने भूमिका साकारली होती. तसंच एक डाव संसाराचा, अजिंक्य या चित्रपटांतदेखील तिनं काम केलं आहे. सारिकाने चाणक्य, जास्वंदी यांसारख्या नाटकांतही काम केलं असून आतापर्यंत अनेक छोट्या-मोठ्या जाहिरातींत काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या