मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Dnyanada Ramtirthakar: ज्ञानदाचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण; अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

Dnyanada Ramtirthakar: ज्ञानदाचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण; अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 13 ऑगस्ट: 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली आहे. या मालिकेने अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.ज्ञानदाचा एक खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे चाहते तिच्याबाबतीत अगदी लहान-लहान गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु ज्ञानदाने आपल्याबाबत एक अशी गोष्ट उघड केली आहे. जी ऐकून चाहतेसुद्धा निराश झाले आहेत. वास्तविक अभिनेत्रीने आपली एक इच्छा अपूर्ण राहिल्याचं सांगितलं आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर सध्या अप्पूची भूमिका साकारत आहे. हटके आणि बिनधास्त अप्पूने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. मालिकेतील अप्पू आणि शशांकची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. त्यामुळेच ही मालिका प्रत्येक आठवड्याला टीआरपी रेसमध्ये टॉप 5 मध्ये समाविष्ट असते.मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात.त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्येक एपिसोडची उत्सुकता लागून असते. दरम्यान अभिनेत्रीने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली होती.यावेळी तिला विविध प्रश्न विचारण्यात आले होते.यावेळी बोलताना अभिनेत्री आपल्याबाबत माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.दरम्यान अभिनेत्रीला तिच्या करिअरसंबंधि प्रश्न विचारण्यात आला होता.यामध्ये तिला तुला कोणत्या कलाकारासोबत काम करण्याची इच्छा आहे किंवा तुझं स्वप्न आहे? यावर उत्तर देत अभिनेत्रीनं म्हंटलं,'असे अनेक कलाकार आहेत,परंतु मला प्रामुख्याने अभिनेता इरफान खानसोबत काम करण्याची प्रचंड इच्छा होती.जरी काम नसतं पण त्यांना लांब कुठे तरी उभं राहून अभिनय करताना प्रत्यक्ष पाहता आलं असतं, तर तीसुद्धा माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती.परंतु दुर्दैवाने माझी ही इच्छा अपूर्ण राहिली. (हे वाचा:Hruta Durgule: हृताला अजिबात करायला आवडत नाही 'ही' गोष्ट; अभिनेत्रीनं सांगितलं आपलं सिक्रेट ) दरम्यान अभिनेत्रीने आपल्याला सई ताम्हणकरसोबत काम करण्याची संधी मिळाली याबाबत आनंद व्यक्त केला आहे.ती नुकतंच 'सिक्रेट्स ऑफ गावस्कर' या वेबसीरिजमध्ये झळकली आहे.ज्ञानदा सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फारच कमी काळात ज्ञानदाने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या