मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांक करतोय 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील शशांक करतोय 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट

ठिपक्यांची रांगोळी ( thipkyanchi rangoli) या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. ही सगळी चर्चा एक फोटोवरून रंगली आहे.

ठिपक्यांची रांगोळी ( thipkyanchi rangoli) या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. ही सगळी चर्चा एक फोटोवरून रंगली आहे.

ठिपक्यांची रांगोळी ( thipkyanchi rangoli) या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. ही सगळी चर्चा एक फोटोवरून रंगली आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर- स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणारी ठिपक्यांची रांगोळी ( thipkyanchi rangoli) ही मालिका कमी वेळेत प्रेक्षकांची आवडती बनली आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे (chetan vadnere) शशांक हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तर अपूर्वाची भूमिका ज्ञानदा रामतीर्थकर निभावत आहे. शशांक बेशिस्त आणि उर्मट असलेल्या अपूर्वासोबत लग्न करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरत आहे. दरम्यान मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा अभिनेता चेतन वडनेरे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत (rutuja dharap) फोटो शेअर केल्याने तो चर्चेत आला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.

दोघांनी एकत्र केली आहे लेहलडाखची ट्रिप

चेतन वडनेरे याने त्याच्या इन्स्टावर अभिनेत्री ऋजुता धारप हिच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून तो अभिनेत्री ऋजुता धारप हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लेहलडाखची ट्रिप एकत्रित केली होती. त्यावरून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत अशी चर्चा रंगली होती. ऋजुता आणि चेतन वडनेरे यांच्या सोबत अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता गौरव मालनकर हे देखील या ट्रिपमध्ये एकत्र दिसले होते.

फुलपाखरू मालिकेतून चेतन आणि ऋजुता यांची झाली ओळख

अभिनेता चेतन वडनेरे हा झी मराठीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. चेतन मूळचा नाशिकचा इथेच आहे. अभिनयाच्या ओढीने त्याचा मोर्चा मुंबईकडे वळला. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील लेक माझी लाडकी या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. या मालिकेत त्याला छोटीशी भूमिका मिळाली होती. झी युवा वरील फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत तो झळकला याच मालिकेत ऋजुता धारप देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसली. फुलपाखरू मालिकेतून चेतन आणि ऋजुता यांची ओळख झाली होती.

वाचा : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये 'हे' असणार नवे नट्टू काका! पाहा व्हायरल फोटो

आई माझी काळूबाई, वर्तुळ, क्राईम पॅशन, घरात मॅरीड बाहेर बॅचलर अशा मालिका आणि नाटकांमधून ऋजुता धारप प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बहुतेक मालिकेतून ती विरोधी भूमिकाच साकारताना दिसली आहे. सन टीव्ही मराठी या नव्याने सुरू झालेल्या जाऊ नको दूर बाबा या मालिकेत देखील ऋजुता काम करताना दिसत आहे.

वाचा : 'राणा दा'च्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत

मात्र या दोघांचे एकत्र फोटो पाहता यांच्यात काही तरी सीजत असल्याची चर्चा आहे. मात्र दोघांनीही याबाबत आजपर्यंत यावर कोणताच खुलासा केलेला नाही.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials