'हॉट' आणि 'बोल्ड' सीनही वाचवू शकले नाही या अभिनेत्रींचं करिअर

हॉट आणि बोल्ड सीन असलेला सिनेमा चालतो असा समज असला तरीही हे सीन काही अभिनेत्रींचं करिअर वाचवू शकलेले नाहीत.

  • Share this:

बॉलिवूडच्या चाहत्यांची आवड दर काही दिवसांनी बदलत असते. सुरुवातीला सिनेमा कलाकारांच्या नावावर चालायचा, तर आता सिनेमाचा विषय किती चांगला आहे यावर सिनेमाचं यश अवलंबून असतं.

सिनेमात किती पैसा गुंतवला गेला याचा प्रेक्षकांना काही फरक पडत नाही. सिनेमाची कथा आणि पटकथा किती चांगली आहे हे ते प्रामुख्याने पाहतात. त्यामुळे बोल्डनेस आणि ग्लॅमच्या विश्वासावर सिनेसृष्टीत आलेल्या अभिनेत्रींना प्रेक्षक फारसं गांभीर्याने घेत नाहीत.

२००४ मध्ये फेमिना मिस इंडिया किताब आपल्या नावावर केल्यानंतर तनुश्री दत्ताने बॉलिवूडची वाट धरली. तिने ‘आशिक बनाया आपने’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात तिने इमरान हाश्मीसोबत अनेक बोल्ड सीन दिले. हा तिचा पहिला आणि शेवटचा हिट होता. यानंतर तनुश्रीने कमबॅक करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात तिला फारसं यश मिळालं नाही.

एका प्रसिद्ध कलाकार कुटुंबात जन्मलेली रिया सेनने आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली सिनेमांत काम केलं आहे. लहानपणापासूनच ती सिनेमांत काम करत आहे. रियानेही आपल्या बोल्डनेसने बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतरांप्रमाणे तिलाही यात फारसं यश मिळालं नाही.

‘ख्वाहिश’ या पहिल्या सिनेमात मल्लिका शेरावत १७ किसिंग सीन देऊन चर्चेत आली होती. यानंतर सुपर हिट सिनेमा मर्डरमध्ये तिने खळबळच माजवली होती. मल्लिका शेरावतने या सिनेमात दाखवलेला बोल्डनेस आतापर्यंत कोणत्याच सिनेमात दाखवला गेला नव्हता. त्यामुळे त्या काळात प्रत्येकाच्या तोंडी मल्लिकाच नाव होतं. मात्र तरीही तिचं बॉलिवूडमधलं करिअर फार काही गाजलं नाही.

मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केलेल्या सेलिना जेटलीने २००३ मध्ये ‘जानशीन’ सिनेमातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. या सिनेमात फरदीन खानसोबत तिने अनेक बोल्ड सीन दिले. तिने ‘खेल’, ‘सिलसिले’, ‘नो एन्ट्री’, ‘जवानी- दिवानी’, ‘जिंदा’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘रेड’, ‘शाकालाका बूम- बूम’, ‘मनी है तो हनी है’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘पेइंग गेस्ट’, ‘थँक्यू’ अशा काही सिनेमांत काम केलं. मात्र तिचंही करिअर फार पुढपर्यंत जाऊ शकलं नाही.

क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी गीता बसरानेही आपल्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर अभिनेत्रींप्रमाणे तिलाही यात फारसं यश आलं नाही. लग्नाआधी तिने अनेक सिनेमांत काम केलं. पण तिच्या पदरी अपयशच पडलं. गीताने द ट्रेन सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिच्यासोबत इमरान हाश्मी होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Nov 21, 2019 08:09 AM IST

ताज्या बातम्या