सलमान खानसोबत बॉलिवूड पदार्पण करुनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप!

सलमानसोबत बॉलिवूड पदार्पण करुनही या अभिनेत्री फ्लॉप ठरल्या

  • Share this:

सलमान खानच्या दबंग 3 मधून लवकरच अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूड पदार्पण करत आहे. एखाद्या नवोदित अभिनेत्रीला लॉन्च करण्याची सलमानची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यानं अनेक नव्या अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये आणलं. पण नंतर या अभिनेत्री अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करु शकल्या नाहीत. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री ज्या सलमानसोबत बॉलिवूड पदार्पण करुनही फ्लॉप ठरल्या...

डान्स कोरिओग्राफर ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या डेझी शाहला सलमाननं 2014 मध्ये 'जय हो' या सिनेमातून लॉन्च केलं होतं. पण त्यानंतर तिला एकही सिनेमा मिळाला नाही ज्यातून ती तिचं अभिनय कौशल्य सिद्ध करु शकेल.

ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहा उल्लल हिनं सलमानच्या 'लकी' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकला नाही. त्यानंतर ती सोहेल खानसोबत आर्यन सिनेमात दिसली. पण या सिनेमानंही तिच्या पदरी निराशाच पडली.

भूमिका चावलानं 2003 मध्ये सलमान खानसोबत 'तेरे नाम' सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा तुफान चालला. यानंतर तिनं अभिषेक बच्चनसोबत 'रन' सिनेमात काम केलं. याशिवाय काही टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली. पण तिचं करिअर फार काळ टिकू शकलं नाही.

2010 मध्ये आलेल्या सलमानच्या वीर सिनेमातून झरीन खाननं बॉलिवूड पदार्पण केलं मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला आणि यासोबत झरीनचं बॉलिवूड करिअर सुद्धा संपलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या