मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार? या तीन अभिनेत्यांची नावं चर्चेत

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार? या तीन अभिनेत्यांची नावं चर्चेत

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्यांची नाव पुढे आली आहेत. पाहा कोण आहेत हे अभिनेते.

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्यांची नाव पुढे आली आहेत. पाहा कोण आहेत हे अभिनेते.

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी काही अभिनेत्यांची नाव पुढे आली आहेत. पाहा कोण आहेत हे अभिनेते.

  • Published by:  News Digital

मुंबई 6 जून: स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Sawarkar) यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच त्यांच्या जयंतीदिनी करण्यात आली. निर्माते संदीप सिंग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या चित्रपटाचं दिग्दर्शन तसेच लेखन करणार आहेत. पण मुख्य म्हणजे आता या चित्रपटासाठी योग्य अभिनेत्याची निवड. व काही नावंही आता समोर येत आहेत. (Veer sawarkar biopic)

स्वांतत्र्यवीर सावरकर  (Vinayak Damodar Sawarkar) यांची भूमिका साकारण्यासाठी सशक्त अभिनेत्याची गरज आहे. त्यामुळे अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurana), रणदीप हुडा (Randeep Hooda) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांची नावं समोर येत आहेत. हे तिघेही चित्रपटातील भूमिकेसाठी शारिरीक बदल घडवण्यास तयार असतात. तसेच कोणत्याही पात्रात स्वतःला ते विलिन करून घेतात. त्यामुळे या तिंघांच्या नावाची निर्मात्यांकडून जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिनेता रणदीप हुडाने 'सरबजीत' (Sarabjit) या चित्रपटासाठी अगदी 20 च दिवसांत 18 किलो वजन कमी केलं होतं. तर त्या चित्रपटातील त्याच्या कामाचं विशेष कौतुकही झालं होतं. याशिवाय राजकुमार राव आणि आयुषमान यांनीही आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच त्यांच्या भूमिका लोकप्रियही ठरल्या आहेत.

22 व्या वर्षीच बोहल्यावर चढले होते राज कपूर; नाटक करायला गेले अन् लग्न करुन मुंबईत परतले

अभिनेता आयुषमानचं नाव जास्त प्रमाणात पुढे असल्याचं म्हटलं जात आहे. तर या भूमिकेसाठी त्याची वर्णीही लागण्याची शक्यता आहे. याशिवाय चित्रपटाचं चित्रिकरण हे अंदमान (Andaman), लंडन आणि महाराष्ट्र या ठिकाणी होणार असल्याचही म्हटलं जात आहे. निर्माते संदीप सिंग चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. त्यांनी सावरकरांच्या जयंतीदिनी या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘स्वांतत्र्यवीर सावरकर’ असं या चित्रपटांच नाव असणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment