साहोमध्ये 'हे' तीन अभिनेते आहेत खलनायकांच्या भूमिकेत

साहोमध्ये 'हे' तीन अभिनेते आहेत खलनायकांच्या भूमिकेत

साहो या सिनेमात अभिनेत्रीच्या भूमिकेत आणि खलनायकांच्या भूमिकेत कोण असणार याची भरपूर चर्चा होती.

  • Share this:

21ऑगस्ट: बाहुबलीमधून आपली छाप पाडणाऱ्या प्रभास त्याच्या पुढच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक बिग बजेट सिनेमा असून या सिनेमाचा नाव 'साहो' आहे. साहो या सिनेमात अभिनेत्रीच्या भूमिकेत आणि खलनायकांच्या भूमिकेत कोण असणार याची भरपूर चर्चा होती.

या सिनेमाच्या अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीचं नावंही चर्चेत होतं. पण अखेर हा रोल श्रद्धा कपूरला मिळाल्याचं बोललं जातंय. तसंच दुसरी चर्चा या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत कोण असणार याची होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे खलनायकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तेव्हा इतकी तगडी स्टार कास्ट असलेला साहो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालतो की आपटतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 05:03 PM IST

ताज्या बातम्या