Home /News /entertainment /

क्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण

क्राइम ब्रान्चच्या चौकशीपूर्वी शिल्पा शेट्टीचं नवऱ्याशी झालं होतं भांडण

क्राइम ब्रान्चच्या एका अधिकाऱ्याने याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यावेळी शिल्पाने राजवर धक्कादायक आरोप केला होता.

    मुंबई, 26 जुलै : राज कुंद्रा पॉर्न व्हिडीओ प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. काही आठवड्यांपूर्वी या प्रकरणात राज कुंद्रा याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचीदेखील चौकशी क्राइम ब्रान्चकडून करण्यात आली आहे. ज्या दिवशी राजबाबत शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यासाठी क्राइम ब्रांन्च त्यांच्या घरी गेली होती, त्या दिवशी दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं होतं. शिल्पा राजवर ओरडली होती. (Shilpa Shetty accused Raj Kundra) काय म्हणाली शिल्पा शेट्टी.. यावेळी शिल्पा म्हणाली की, हे सर्व करण्याची काय गरज आहे. यामुळे इंडस्ट्रीमध्ये कुटुंबाची किती बदनामी झाली याचा अंदाजा तरी तुला आहे का, इतकं मोठं कारस्थान केलं, मात्र मला काहीच सांगितलं नाहीस. मला याबद्दल काहीच कळालं नाही. यानंतर रडत रडत शिल्पा शेट्टीने पोलिसांना आपलं स्टेटमेंट दिलं होतं. क्राइम ब्रान्च जेव्हा शिल्पाच्या घरी पोहोचली होती, त्याच दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. हे ही वाचा-राज कुंद्रा कसा करायचा आर्थिक व्यवहार? धक्कादायक माहिती आली समोर क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, पोर्नोग्राफी प्रकरणात फेब्रुवारीमध्ये जेव्हा याबाबत गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा शिल्पा आणि राज यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. तेव्हा शिल्पा आणि राज यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. या प्रकरणामुळे शिल्पाच्या इमेजला धक्का बसला असल्याचं तिचं म्हणणं होतं. तिच्या हातातून अनेक एडोर्स तुटले होते. याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला होता. क्राइम ब्रान्चच्या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टी खूप अपसेट होती. ज्यानंतर कुंद्राने शिल्पाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिल्पा खूप राहात होती आणि क्राइम ब्रान्चला मध्ये पडून त्यांचा वाद सोडवावा लागला होता. मुंबई क्राइम ब्रान्चच्या एका मोठ्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान राज कुंद्राच्या आर्थिक व्यवहाराबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज कुंद्रा या पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर थेट पैसे स्विकारत नव्हता. असं केल्यास त्याला मोठ्या प्रमाणावर कर द्यावा लागला असता. यासाठी त्याने एक जॉइंट अकाउंट सुरु केलं होतं. तो आधी पैसे लंडनमधील बँकेत पाठवायचा त्यानंतर ते पैसे इतर देशांमधील अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जायचे. अन् त्या अकाउंटमधून उर्वरीत आर्थिक व्यवहार केले जात होते. राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी ही धक्कादायक माहिती क्राईम ब्रांचच्या हाती लागली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Raj kundra, Shilpa shetty

    पुढील बातम्या