'हलाल' सिनेमाच्या रिलीजला थिएटर मालकांचा विरोध

'हलाल' सिनेमाच्या रिलीजला थिएटर मालकांचा विरोध

काही संघटनांनी हा सिनेमा रिलीज होऊ न देण्याचा इशारा दिल्यानंतर थिएटर मालकांनी हा सिनेमा रिलीज करायला असमर्थता दर्शवलीय. त्यामुळे सांगली, मालेगाव, औरंगाबाद आणि पुण्यातील सिटीप्राईड थिएटरनेही हा सिनेमा रिलीज करायला नकार दिलाय.

  • Share this:

03 आॅक्टोबर : 'हलाल' हा सिनेमा रिलीज करायला थिएटर्स मालकांनी नकार दिल्याने या सिनेमाच्या रिलीजमध्ये मोठा अडथळा निर्माण झालाय. आधी तब्बल 200 ते 250 थिएटर्समध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाला ठिकठिकाणी विरोध सुरू झालाय. काही संघटनांनी हा सिनेमा रिलीज होऊ न देण्याचा इशारा दिल्यानंतर थिएटर मालकांनी हा सिनेमा रिलीज करायला असमर्थता दर्शवलीय. त्यामुळे सांगली, मालेगाव, औरंगाबाद आणि पुण्यातील सिटीप्राईड थिएटरनेही हा सिनेमा रिलीज करायला नकार दिलाय.

हलाल हा सिनेमा हलाला निकाह या पद्धतीवर भाष्य करतो. 1981 साली राजन खान यांनी लिहिलेल्या कथेवर दीड वर्षांपूर्वी सिनेमा तयार झाला. त्यानंतर पुणे, गोवा आणि कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो राज्य शासनातर्फे अधिकृत एंट्री म्हणून पाठवण्यात आला. या सगळ्याच ठिकाणी प्रेक्षकांनी हा सिनेमा उचलून धरला. अशा वेळी महाराष्ट्रात त्याला होत असलेला विरोध अनाकलनीय आहे.

काही दिवसांपूर्वी साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून 2 ते 3 फलकांना मुस्लिम संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची घटना घडली होती.

शिवाजी लोटन पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव यांच्या भूमिका आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 06:58 PM IST

ताज्या बातम्या